Karnataka Assembly Elections : बसवराज बोम्मईंचे धोरण बरोबर होते, पण शिंदे-फडणवीस सरकारमुळे झाली अडचण...

Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Basavaraj Bommai News
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Basavaraj Bommai NewsSarkarnama

Karnataka Assembly Elections Result News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसने 135 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर जेडीएस'ला अवघ्या 19 जागा मिळाल्या. यामध्ये मुंबई-कर्नाटक विभागाचा मोठा वाटा आहे.

मुंबई-कर्नाटक प्रदेशात लिंगायत समाजाच्या मतदारांचे प्रमाण मोठे आहे. येथे साधारण १७ टक्के लोक हे लिंगायत समाजाचे आहे. या भागात काँग्रेसने एकूण ५० पैकी ३३ जागांवर विजय मिळवला आहे. २०१८ मध्ये काँग्रेसने (Congress) येथे फक्त १६ जागांवर तर भाजपाने ३१ जागांवर विजय मिळवला होता. तर येथे मराठी मतांचाही टक्का मोठा आहे. यामध्ये विशेष करुन बेळगाव आणि धारवाडसह इतर जिल्ह्यातही मराठी मते आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Basavaraj Bommai News
Rahul Gandhi News : 'भारत जोडो'नंतर कर्नाटकच्या विजयाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी झळाळी!

मात्र, या भागात भाजपला (BJP) फटका बसणार असल्याची शक्याता होती. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागाबद्दल ट्विट करत रोखठोक भूमिका घेतली होती. सीमा भागाबाबत थेट भूमिका घेतल्यामुळे लिंगायत आणि इतर स्थानिक मते आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतील असा होरा बोम्मई यांचा होता. त्यामुळे त्यांनी सीमा भागाचा विषयही तापवला होता.

मात्र, महाराष्ट्रात नुकतेच सत्तांतर झाले होते. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले होते. बोम्मई यांनी सीमा भागाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली होती. यानंतर अमित शाह यांनी बोम्मई यांची भेट घेतली, आणि सीमा भागाबद्दल त्यांची भूमिका मवाळ झाली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Basavaraj Bommai News
IPS Praveen Sood New CBI Director : वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

बोम्मई यांना आपली भूमिका मवाळ करावी लागली. त्यामुळे त्यांचा फटका भाजपला या निवडणुकीत बसला. कारण त्यांना लिंगायत मतदारांनाही आकर्षीत करता आले नाही आणि मराठी मतदारांच्याही रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना मोठा फटका या मुंबई-कर्नाटक भागात बसला. बेळगावात एकूण 18 जागांपैकी 11 जागा काँग्रेसने जिंकल्या तर भाजपला केवळ 7 जागा जिंकता आल्या.

हा परिसर भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. येथे लिंगायत मतदारही मोठ्या संख्येने असल्याने भाजपला येथे यश मिळत होते. मात्र, निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. काँग्रेसने येथे 50 पैकी तब्बल 33 जागा जिंकल्या. भाजपला 16 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला येथे 40 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. त्यामुळे बोम्मईंची भूमिका योग्य होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारमुळे कोंडी झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com