असंही राजकारण! राज्यात काँग्रेसचे आमदार दोन पण राज्यसभेचे उमेदवार तीन

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दहा उमेदवारांची यादी
Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) दहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून संधी दिली आहे. उत्तर प्रदेशातील एकूण तीन नेत्यांचा या यादीत समावेश आहे. हे तिन्ही उमेदवार अन्य राज्यांतून राज्यसभा लढतील. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे केवळ दोन आमदार असताना तेथील तीन नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी पक्षानं दिली आहे. यामुळे इतर राज्यांतील काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Rajya Sabha Election News Updates)

उत्तर प्रदेशातून इम्रान प्रतापगढी, राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रतापगडी आणि तिवारी हे प्रतापगड या जिल्ह्यातील आहेत. शुक्ला हे आधीपासून संसद सदस्य होते. ते कानपूर जिल्ह्यातील आहे. शुक्ला यांना छत्तीसगड, प्रतापगडी यांना महाराष्ट्र आणि तिवारी यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे केवळ दोन आमदार असताना राज्यातील तीन नेत्यांना पक्षानं राज्यसभेची संधी दिल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे.

उमेदवारांची यादी जाहीर करताना काँग्रेसने असंतुष्ट नेत्यांच्या 'जी २३' गटाला डावललं आहे. या यादीत तुलनेने तरुण आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्ती चेहऱ्यांना स्थान दिलं आहे. उदयपूरला झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार निर्णय घेत जुन्या नेत्यांना घरी बसवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात याही वेळी काँग्रेसने बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा कायम राखली. उत्तर प्रदेशातील मुस्लिम नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवार मिळाली आहे.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
निष्ठेचं फळ! मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीवर पाणी सोडणाऱ्या नेत्याला राज्यसभेचं बक्षीस

'जी२३' गटाचे प्रमुख नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांनी सलग चार ते पाच वेळा राज्यसभेवर प्रतिनिधित्व केल्याने नव्या नेत्यांना संधी देण्याचा निकष आता लावला आहे. 'जी २३' गटातील पण नंतर गांधी कुटुंबाकडे वळालेले मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून तर याच गटातील दुसरे नेते विवेक तनखा यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
पोलिसांनी सुरक्षा काढून घेतली अन् 24 तासांतच काँग्रेस नेत्याची हत्या

महाराष्ट्रातून राज्यसभेची मुदत संपलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तमिळनाडूतून उमेदवारी मिळाली आहे. राजीव शुक्ला यांना छत्तीसगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सरचिटणीस जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला यांना अनुक्रमे कर्नाटक आणि राजस्थानमधून उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख ब्राह्मण नेते प्रमोद तिवारी यांना राजस्थानमधून संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांना हरियानातून उमेदवारी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in