पाच वर्षांत तब्बल १७० आमदारांचा काँग्रेसला रामराम तर भाजप सोडणारे फक्त 18!

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून मागील पाच वर्षांतील पक्ष बदलणाऱ्या आमदारांची यादी जाहीर केली आहे.
congress 170 mlas left party in last five years to contest election
congress 170 mlas left party in last five years to contest election

नवी दिल्ली : देशात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत झालेल्या निवडणुकांदरम्यान पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या आमदारांबाबतचा अहवाल जाहीर झाला आहे. पाच वर्षांत काँग्रेसच्या तब्बल १७० आमदारांनी पक्षाला हात सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे. याचवेळी भाजपच्या केवळ १८ आमदारांनी पक्ष सोडला आहे, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसमधील दलबदलू दहापट अधिक आहेत. 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या निवडणूक हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल जाहीर केला आहे. 2016-2020 या पाच वर्षांत राजकीय पक्ष बदलून पुन्हा निवडणूक लढविणारे ४०५ आमदार होते. त्यापैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर, ३८ जण काँग्रेस तर २५ जण तेलंगण राष्ट्र समितीत दाखल झाले. मागील  लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये पाच खासदारांनी स्वपक्षाचा त्याग करुन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तसेच, 2016-2020 या काळात काँग्रेस पक्षातील राज्यसभेच्या सात खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. 

२०१६ ते २०२० या कालावधीत झालेल्या निवडणुकांदरम्यान १७० काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडला. या पाच वर्षांच्या काळात पुन्हा निवडणूक लढविणाऱ्या १६ पैकी १० राज्यसभा खासदारांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, मागील लोकसभा निवडणुकीवेळी पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या 12 पैकी 5 खासदारांनी दुसऱ्या पक्षांतून काँग्रेसध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक या राज्यामधील सरकारे आमदारांनी पक्ष सोडल्याने कोसळली, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

नॅशनल इलेक्शन वॉच आणि 'एडीआर'ने हा अहवाल तयार करण्यासाठी ४३३ खासदार आणि आमदारांचे प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. या सर्वांनी पक्ष बदलून पुन्हा निवडणुका लढविल्या होत्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com