महाराष्ट्रासह देशावर ब्लॅकआऊटचे संकट; आता हे काम कराच!

दिल्लीसह देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, पंजाब, राजस्थान यांसह अनेक राज्यांवर ब्लॅकआऊटचे संकट घोंघावत आहे.
महाराष्ट्रासह देशावर ब्लॅकआऊटचे संकट; आता हे काम कराच!
Mahavitaran

नवी दिल्ली : दिल्लीसह देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, पंजाब, राजस्थान यांसह अनेक राज्यांवर ब्लॅकआऊटचे संकट घोंघावत आहे. कोळशाच्या टंचाईमध्ये अनेक राज्यांतील वीजनिर्मिती केंद्र बंद पडली आहेत. तसेच पुढील काही दिवसांचा साठा शिल्लक असल्याने मोठे वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भारनियमनाला सुरूवात केली जाऊ शकते.

जागतिक पातळीवर कोळशाच्या किंमती वाढल्याने टंचाई झाल्याचे तसेच चीनमधील स्थितीही त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पुढील दोन दिवसांत कोळसा पुरवठा सुरळित न झाल्यास राजधानीत ब्लॅकआऊट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार टंचाई नसल्याचे सांगत असले तरी महाराष्ट्रात कोळशाअभावी 13 वीजनिर्मिती केंद्रे बंद पडली आहेत.

Mahavitaran
भाजपचा दे धक्का; जम्मूतील दोन बडे नेते पक्षाच्या वाटेवर

पंजाबमध्ये आधीपासून भारनियमन सुरू करण्यात आलं आहे. पंजाबमध्ये पुढील केवळ पाच दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक राहिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याची स्थिती खूपच गंभीर असल्याचे सांगितले. त्यांनीही पंतप्रधान मोदींना यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने मात्र कोळशाच्या टंचाईचे खापर गेल व टाटामधील समन्वयाच्या अभावाने झाल्याचे म्हटले आहे.

तसेच सरकारने कोळशाच्या टंचाईची चार कारणे सांगितली आहेत. वीजेच्या मागणीत अभूतपूर्व वाढ, कोळशाच्या खाणी असलेल्या परिसरात मुसळधार पाऊस, आयात कोळशाच्या किंमतीत वाढ तसेच महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशासह अन्य काही राज्यांमध्ये कोळसा कंपन्यांनी वाढवलेल्या किंमती या कारणांनी कोळशाची टंचाई भासत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

Mahavitaran
डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...

आता हे कराच!

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवावा लागणार आहे. वीज ग्राहकांनी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची स्थिती

कोळसा टंचाईमुळे 13 वीज निर्मिती केंद्र बंद पडल्याची माहिती महावितरणकडून रविवारी देण्यात आली. कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) शनिवारी 17 हजार 289 मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर, शनिवारी 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे रविवारी विजेच्या मागणीत घट झाली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता राज्यात 18 हजार 200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती.

Related Stories

No stories found.