चिराग पासवानांचा पत्ता भाजपने कापला...पण पडद्यामागील सूत्रधार नितीशकुमार..?

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडणाऱ्या चिराग पासवान यांना भाजपने धक्का दिला आहे.
chirag paswan tries to evade question about rajya sabha election
chirag paswan tries to evade question about rajya sabha election

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच राहिले तरी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. यामुळे नाराज असलेल्या मोदींना अखेर भाजपने राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांचे पुर्नवसन केले आहे. या पुनर्वसनाची मोठी किंमत लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना मोजावी लागणार आहे. या सर्व घटनाक्रमावर चिराग पासवान यांनी सूचक मौन बाळगले आहे. मात्र, या सर्व प्रकरणात पडद्यामागील सूत्रधार नितीशकुमार असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या होत्या. 

चिराग पासवान यांनी राज्यात एनडीएशी फारकत घेत राष्ट्रीय पातळीवर भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या काही जागा कमी करण्यात यश मिळवले होते. पासवान हे सतत नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करीत होते. त्यांची भाजपशी छुपी युती असल्याचीही चर्चा होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर भाजपने पासवान यांचा मोठा झटका दिला आहे. 

लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदींना त्यांचा उमेदवारी दिली आहे. भाजपने एकाच वेळी मोदींचे पुनर्वसन आणि चिराग पासवान यांना झटका देण्याची चाल खेळली आहे. यामुळे पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 डिसेंबर  आहे. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

या सर्व घटनाक्रमावर चिराग पासवान यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक मौन बाळगले आहे. रामविलास पासवान यांच्यानंतर निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या पत्नी निवडणूक लढतील, अशी शक्यता होती. आता भाजपने सुशीलकुमार मोदींचे नाव या जागेवर पुढे केले आहे. यामागे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला मोठा फटका बसला आहे. याचा वचपा काढण्यासाठी नितीशकुमार यांनीच यासाठी भाजपवर दबाव आणल्याची चर्चा आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com