नारायण राणे म्हणतात, चीनची खेळणी दर्जेदार!

जम्मूमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बुधवारीदर्जा, मार्केटिंगबाबत चीनचं उदाहरण दिलं आहे.
नारायण राणे म्हणतात, चीनची खेळणी दर्जेदार!
Narayan Rane

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चीनमध्ये उत्पादित खेळणी दर्जेदार असल्याचं म्हटलं आहे. जम्मूमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बुधवारी दर्जा, मार्केटिंगबाबत चीनचं उदाहरण दिलं आहे. (Chinese toys are of good quality said Narayan Rane)

राणे म्हणाले, आपलं खेळणं बघा आणि चीनचे खेळणं बघा. खुपच कमी किंमत असते. मुलं बघूनच खुश होतात. याच क्लालिटीचं खेळणं पाहिजे, असा हट्ट करतात. ते खेळणं चीनचं असतं. त्यामुळं चीनचं खेळण्यांमधील मार्केट 64 टक्के आहे. भारताचा वाटा सहा टक्क्यांपेक्षा जास्त नाही, असं राणे यांनी नमुद केलं. त्यामुळे या उद्योगात असलेल्या उद्योजकांना अद्ययावत तंत्रज्ञान वापर करण्याचा सल्ला द्यायला हवा. याबाबतचे सर्व व्यवस्थापन कसं करावं, याबाबत त्यांच्यापर्यंत पोहचवायला हवं. हेच आमच्या विभागाचं काम आहे, असंही राणे म्हणाले.  

देशातील 80 टक्के उद्योग एमएसएमई या विभागांतर्गत येतात. नागरिकांना उद्योजक बनवणे, नोकऱ्या निर्माण करणे, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे. देशाची निर्यात वाढायला हवा. देशाचा विकास दर वाढवायचा आहे. आपला देश महासत्ता व्हावा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येकानं हातभार लावायला हवा. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं राणे यांनी सांगितलं. 

भारत प्रगतीशील देश असून जगभरात कौतुक होत आहे. मी दिल्लीत दोन महिन्यांपूर्वी आलो. मी 36 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. जिथे काम केलं तिथे न्याय देण्याचं काम केलं आहे. एका प्रगत राज्याचा मुख्यमंत्री होतो. देशातील ठिकठिकाणांहून लोक तिथं येऊन काम करतात. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्येही तशी प्रगती व्हावी. इथल्या लोकांना रोजगार देण्यासाठी, उद्योजक बनवण्यासाठी मदत करत राहू, असं आश्वासन राणे यांनी यावेळी दिलं. 

अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करायचे असते. त्यांच्याविषयी वाईट बोलले तर ते सोबत काम करणार नाहीत. त्यांच्याकडून चांगले काम करायचे असेल तर चांगलेच बोलावे लागेल. त्यानंतरही चांगले काम झाले नाही तर मग मंत्र्यांकडे काही अधिकार असतात, असा इशारा राणे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in