मुंख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांकडून पोलिसांना खुली सूट दिल्यानंच अंडरवर्ल्ड कंट्रोलमध्ये!

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोघांसह दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी जान मोहम्मद शेख या मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे.
Uddhav Thackeray Dilip Walse Patil
Uddhav Thackeray Dilip Walse Patil

मुंबई : दिल्ली पोलिसांनी मुंबईसह देशभरातून सहा दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केल्यानंतर महाराष्ट्र हादरला आहे. दहशतवाद्यांच्या चौकशीमध्ये मुंबईतील लोकल टार्गेटवर असल्याचं वृत्त आहे. तसेच यामध्ये अंडरवर्ल्डची लिंकही (Mumbai Underworld) जोडली जात आहे. पण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS)चे प्रमुख विनीत अगरवाल (Vinit Agarwal) यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मुंबई व महाराष्ट्र सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एटीएसला पूर्ण मोकळीक दिल्यानं अंडरवर्ल्ड कंर्टोलमध्ये असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Chief Minister & Home Minister gives free hand to ATS)

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोघांसह दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी जान मोहम्मद शेख या मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर विस्फोटक व हत्यारं सापडली आहेत. देशात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा त्यांचा कट होता, असं त्यांच्या चौकशीतून समोर आलं आहे. त्यामध्ये मुंबई लोकलही टार्गेटवर असल्याचे दावा केला जात आहे. त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

मुंबईतून एकाला अटक केल्याचे समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलिस आयुक्त, महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई व त्याअनुषंगाने राज्यातील सुरक्षेचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

बैठकीनंतर एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, मुंबईतील अंडरवर्ल्ड नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी आम्हाला पूर्ण मोकळीक दिली आहे. मुंबईतून जान मोहम्मदला पकडण्यात आलं असलं तरी यात एटीएसचं अपयश नाही. थेट दिल्ली पोलिसांनी याबाबत यंत्रणांकडून माहिती देण्यात आली होती. एटीएस ही माहिती नव्हती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

दहशतवाद्यांकडे विस्फोटकं सापडली असली तरी महाराष्ट्रात काहीही सापडले नाही. जान मोहम्मदकडे पोलिसांनी विस्फोटक मिळाली नाहीत. मुंबईत रेकीही केलेली नाही. ते करणार होते. त्यामुळं यात एटीएसचं अपयश म्हणता येणार नाही, असंही अगरवाल यांनी स्पष्ट केलं आहे. जान मोहम्मदकडं अधिक चौकशी करण्यासाठी एटीएसची टीम दिल्लीला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com