पंतप्रधान मोदींच्या स्वागताला ना कोश्यारी, ना ठाकरे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात मोदी हे सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील.
chief minister and governor will not receive prime minister modi at pune airport
chief minister and governor will not receive prime minister modi at pune airport

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात राज्याकडून होणाऱ्या स्वागताला ना राज्यपाल उपस्थित राहू शकतील, ना मुख्यमंत्री. पंतप्रधान कार्यालयाने पदाधिकारी आणि राजकीय व्यक्तींना स्वागत आणि निरोप प्रसंगी परवानगी दिलेली नाही. याबाबत स्पष्ट कारण दिले गेले नसले तरी या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहतील की नाही? याबाबत साशंकता असताना थेट पंतप्रधान कार्यालयाकडूनच राजकीय व्यक्ती आणि पदाधिकारी यांना स्वागत आणि निरोपाला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

पंतप्रधान देशातील कोणत्याही राज्यात दौऱ्यासाठी गेले की त्या राज्याच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे स्वागत केले जाते. अपवाद वगळता हा संकेत पाळला जात असतो. मात्र पंतप्रधानांच्या आजच्या पुणे दौऱ्याला थेट पंतप्रधान कार्यालयाकडून राजकीय व्यक्ती आणि पदाधिकारी यांना स्वागत आणि निरोपाला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यासाठी कोरोनाचा संसर्ग हे कारण असल्याचे बोलले जात असून पंतप्रधानांच्या स्वागताची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

पुणे विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत 'सदर्न कमांड'चे लेफ्ट. जन. सी.पी. मोहंती, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार सहाय, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एअर फोर्सचे कमांडर एच. असुदानी हे करणार असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये 'सिरम'चे संस्थापक सायरस पुनावाला, सीईओ आदर पुनावाला आणि कार्यकारी संचालक नताशा पूनावाला हे स्वागत करणार आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याची वेळ बदलली !
पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात सिरमला भेट देण्याची वेळ आधी दुपारी १ ते २ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र या वेळेत आता बदल करण्यात आला असून ही वेळ आता दुपारी ४:२५ ते सायंकाळी ५:२५ अशी करण्यात आली आहे. नव्या नियोजित वेळेनुसार दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी पंतप्रधान मोदी पुणे विमानतळ येथे पोहोचणार आहेत. तर ५ वाजून ५५ मिनिटांनी ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com