एकनाथ शिंदेच नव्हे तर अनेक मंत्री नाराज! चंद्रकांतदादांनी सांगितलं कारण...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वक्तव्य केलं होतं.
Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray Government
Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray Government

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केवळ शिंदेच नव्हे तर ठाकरे सरकारमधील अनेक मंत्री नाराज असल्याचा दावा केला. हा दावा करताना त्यांनी यामागचं कारणही सांगितलं आहे. (Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray Government)

माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, राणे हे नव्याने भाजप मध्ये आले असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. ज्या शिवसेनेबाबत ते बोलतात त्या सेनेत राणेही होते. राणे छातीठोकपणे सांगतात म्हणजे त्यात तथ्य असेल. शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले की लाल दिवा, केबीन, स्टाफ मिळतो. पण या मंत्रिमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

वसईत हितेंद्र ठाकूर व राणे यांची भेट राजकीय नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राणेंसारखा मोठा नेता कोणाला भेटल्यानंतर त्याचा लगेच राजकीय अर्थ काढू नये. भाजप कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे, असेही पाटील म्हणाले. सरकारमधील तीन पक्षांत दुखावल्याने भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ. पुढील निवडणुका स्बळावरच लढू, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. 

रावसाहेब दानवे ग्रामीण नेते

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना सांड असं संबोधलं होतं. त्यावरून दानवे यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. यावर सारवासारव करताना पाटील यांनी दानवे हे ग्रामीण भागातील नेते असून त्यांची ग्रामीण बोली भाषा आहे, असं सांगितलं. राहुल गांधींबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ हा अनादर करणे असा होत नाही, असंही पाटील म्हणाले.  

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी खात्याला निधी मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी सगळ्याच मंत्र्यांची गळचेपी होत असल्याची टीका केली. ठाकूर यांच्या रोख प्रामुख्याने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com