केंद्रीय मंत्री भारती पवार 'अॅक्शन मोड'वर; कोरोना वाढलेल्या राज्यांत पाठवले तज्ज्ञ

नव्यायांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॅा. भारती पवार यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पद मिळाले आहे.
Central teams rush to states reporting surge in COVID 19 cases says Bharti Pawar
Central teams rush to states reporting surge in COVID 19 cases says Bharti Pawar

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॅा. भारती पवार यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून कामाला सुरूवातही केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी अधिवेशनाच्या सर्व मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं डॅा. पवार यांनी मंत्रालयातून कामाला सुरूवात केली आहे. (Central teams rush to states reporting surge in COVID 19 cases says Bharti Pawar)

माध्यमांशी बोलताना डॅा. पवार यांनी कोरोनाविषयी उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार यंत्रणा शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन काम करत आहे. कोरोनाविषयक माहिती दररोज राज्यांकडून घेतली जात आहे. कोरोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये सरकारने आधीच तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. महाराष्ट्र व केरळमधील स्थितीवर लक्ष्य ठेवून आहोत.

कोरोनाच्या संसर्गाबाबत केंद्र सरकारकडून आणखी पावले टाकली जातील. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया याबाबत दररोज बैठक घेत आहेत. या बैठकीत देशभरातील स्थितीचा आढावा घेतला जात आहे. रविवारीही बैठक झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे सर्व राज्यांनी पालन करायला हवे. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही पवार यानी केले. 

दरम्यान, महाराष्ट्र व केरळसह आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकामध्ये देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात रविवारी 8 हजार 535 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 61 लाख 57 हजार 799 वर पोहचली आहे. तर केरळमध्ये रविवारी 12 हजार रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णसंख्या 30 लाख 65 हजारांच्या पुढे गेला. 

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी घेतलेल्या राज्यांच्या बैठकीत दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सीनेट यांसह कोरोना नियमांचे पालन या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आदेश राज्यांनी दिले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देत उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com