पक्षात कोण विचारत नाही, असं म्हणणाऱ्या सुमित्राताईंचा भाजपने 'पद्मभूषण' देऊन ठेवला मान!

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा समावेश आहे.
central government announces padmabhushan award to sumitra mahajan
central government announces padmabhushan award to sumitra mahajan

नवी दिल्ली : आजकाल मला पक्षात कोण विचारत नाही, अशी जाहीर खंत काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली होती. सुमित्रा महाजन यांना लोकसभेचे तिकिट भाजपने नाकारले होते. तेव्हापासून त्यांना पक्षाने अडगळीत टाकल्याचे चित्र होते. आता सरकारने त्यांचा पद्मभूषण सन्मान जाहीर करुन त्यांचा मान ठेवल्याची चर्चा आहे. 

सुमित्रा महाजन यांनी सलग आठ वेळा इंदोर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिकिट नाकारले होते. त्यावेळी उघडपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांच्या जागी शंकर ललवानी यांना तिकिट देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर सुमित्रा महाजन यांना पक्षाने अडगळीत टाकल्याचे चित्र होते. 

याच महिन्यात इंदोर महापालिकेच्या महापौरांची निवड होणार होती. त्यासाठी कोण योग्य उमेदवार असेल, अशी विचारणा महाजन यांना करण्यात आली होती. यावर त्यांनी उमेदवाराचे नाव सुचवण्यास नकार दिला होता. मला आजकाल पक्षात कोण विचारत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. तिकिट देणाऱ्यांनाच विचारा कोण चांगला उमेदवार आहे. माझ्याशी चर्चा झाली असती तर मी एक-दोन चांगली नावे सुचवली असती, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली होती. 

आता सरकारने सुमित्रा महाजनांना पद्मभूषण देऊन त्यांचा मान ठेवला आहे. मात्र, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दल आश्चर्य वाटते. माझ्या क्षमतेनुसार चांगले काम करण्याच प्रयत्न मी नेहमीच केला आहे. तुमचे काम जर चांगले असेल तर त्याचे फळ हे मिळतेच. 

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. केंद्र सरकारने आज साज जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे, दिवंगत गायक एस.पी.बालसुब्रमण्यम, डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे, दिवंगत डॉ. नरिंदरसिंग कपानी, मौलाना वहिउद्दीन खान, पुरातत्वज्ञ बी.बी.लाल, वालूशिल्पकार सुदर्शन साहू यांचा समावेश आहे.

पद्मभूषण सन्मान दहा जणांना जाहीर झाला आहे. यात कला क्षेत्रात कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा, आसामचे दिवंगत माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, साहित्यिक चंद्रशेखर कंबार, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी सनदी नृपेंद्र मिश्रा, लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान,  दिवंगत राजकीय नेते केशुभाई पटेल, दिवंगत कलबे सादिक, उद्योगपती रजनीकांत देविदास श्रॉफ, त्रिलोचनसिंह यांचा समावेश आहे. 

पद्मश्री सन्मान  102 जणांना जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, साहित्यिक नामदेव कांबळे, कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे, उद्योजिका जसवंतीबेन जमनादास पोपट यांचा समावेश आहे.    

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com