रिया चक्रवर्तीवर आता 'सीबीआय'चा फेरा - CBI to interrogate Rhea Chakraborty in Sushant Sucide case | Politics Marathi News - Sarkarnama

रिया चक्रवर्तीवर आता 'सीबीआय'चा फेरा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

आता काही वेळातच रिया चक्रवर्ती सीबीआयचे पथक ज्या ठिकाणी चौकशी करत आहे त्या डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहोचणार आहे. सीबीआयने गेल्या काही दिवसांत अनेकांकडे चौकशी केली आहे. त्यांच्याकडे सुशांत व रिया यांच्या संबंधांब्बत चौकशी केली आहे. ईडीच्या चौकशीनंतर आता आठ दिवसांनी रियाची सीबीआयकडून चौकशी होणार आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आता सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्य सीबीआयने बजावले आहे. या आधी तिची सक्तवसुली संचनालयाने (ईडी) कसून चौकशी केली आहे. दरम्यान, रिया चक्रवर्तीचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हाही काही वेळापूर्वीच डीआरडीओ गेस्ट हाऊसला दाखल झाला आहे

आता काही वेळातच रिया चक्रवर्ती सीबीआयचे पथक ज्या ठिकाणी चौकशी करत आहे त्या डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहोचणार आहे. सीबीआयने गेल्या काही दिवसांत अनेकांकडे चौकशी केली आहे. त्यांच्याकडे सुशांत व रिया यांच्या संबंधांब्बत चौकशी केली आहे. ईडीच्या चौकशीनंतर आता आठ दिवसांनी रियाची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. 

रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल धक्कादायक माहिती ईडीच्या तपासात उघड झाली आहे. ईडीच्या हाती रियाचे व्हॉट्सअॅप चॅट लागले आहेत. यात रिया ही ड्रग्ज घेत असल्यासोबत ड्रग्जच्या वितरणातही सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ड्रग कार्टेलमधील रियाच्या सहभागाबाबत आता ईडी चौकशी करीत आहे. ईडीने आता रियाचे व्हॉट्सअॅप चॅट सीबीआय आणि राष्ट्रीय अमली पदार्थ  नियंत्रण विभागालाही (एनसीबी) देण्यात आले आहे. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास करीत असताना एनसीबी आता यातील अमली पदार्थांच्या अँगलचा तपास करणार आहे. एनसीबीने रियाच्या विरोधात गुन्हाही नोंदवला आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख