पंकजा मुंडेंसह एक खासदार, दोन आमदार अन् एका माजी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन दसरा मेळावा घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
case registered against pankaja munde and other leaders for violating social disatncing
case registered against pankaja munde and other leaders for violating social disatncing

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काल ऑनलाइन दसरा मेळावा घेतला होता. हा मेळावा ऑनलाइन असला तरी गर्दी जमवून नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी पंकजा मुंडेंसह एक खासदार, दोन आमदार अन् माजी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे काल दसरा मेळावा झाला. यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑनलान मेळावा झाला. या वेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, भिमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे आदी उपस्थित होते. 

हा मेळावा ऑनलाइन असल्याने नागरिकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पंकजा यांच्यासह मेळाव्याला उपस्थित इतर नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. यामुळे पोलिसांनी पंकजा मुंडे, खासदार कराड, आमदार राजळे, बोर्डीकर आणि जानकर यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, कलम 51(ब) आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काल या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडेंना विरोधकांचा जोरदार समाचार घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या की, मला तोडण्याचा प्रयत्न झाला, मी राजकारण सोडलं, घरात बसले असा अपप्रचार करण्यात आला. मात्र,  मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धे ज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र, मला चक्रव्यूह तोडता येते. हा मेळावा एकदिवस शिवतिर्थावर घेणार आहे. 

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, नुकसानभरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत व अभिनंदन. मात्र, हे पॅकेज पुरेसे नाही, एवढ्या मदतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही,मायबाप सरकारने उदारता दाखवावी, अन्यथा रस्त्यावर उतरु. ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा प्रश्न दोन महिने का लांबला. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत तर ढाब्यावर बसून होतात का? 

खासदार शरद पवार, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत माझी चर्चा झाली असून पुढेही चर्चा करु. ऊसतोड कामगारांच्या घामाची जाण आहे. त्यांना लाचारी नको, स्वाभिमान म्हणून आपण ऊसतोडणीस जा म्हणून सांगितले. लोक बैठकीनंतर बघू म्हणतात. तुमचा आकडा सांगा, पक्षाचे पत्रक काढून, दौरा करुन काय झाले, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात पाठवू असा टोला लगावतांनाच तुमच्या २७ तारखेच्या बैठकीनंतर मी काय ते ठरवेल, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com