मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते?

धनंजय मुंडे सध्या अडचणीत
Dhananjay Munde
Dhananjay Munde

पुणे : दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. याबाबत पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसला तरी निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या पत्नीची आणि मुलांची माहिती लपवून ठेवली हा गुन्हा आहे. मात्र त्यामुळे पद रद्द होण्याची शक्यता फार कमी आहे. अद्याप तसा एकही न्यायालयीन निकाल अद्याप लागला नसल्याचे सांगण्यात आले.

दोन अपत्यांचा नियम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आहे. आमदार किंवा खासदार यांच्यासाठी हा नियम नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना एकूण पाच अपत्ये असली तरी त्याचा काही पदाशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

याबाबत पुण्यातील वकिल असीम सरोदे यांनी सांगितले की मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवली असल्याने त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. त्यांनी विधानसभेची 2014 आणि 2019 ची निवडणूल लढविली. त्यात मुलांची माहिती भरणे अपेक्षित होती. त्यांनी ती भरली नाही. त्यांनी वडील म्हणूण जबाबदारी घेतली आहे. खोटी माहिती व शपथपत्र भरताना माहिती लपवली म्हणून गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते. अशी अनेक प्रकरणे यापूर्वी  घडली आहेत. मात्र निवडणूक आयोगाने कारवाई केलेली नाही. त्यामुळे मुंडे यांच्या बाबतीत निवडणूक आयोग काय कारवाई करत ते पाहावे लागेल.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने  बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. हे सर्व आरोप खोटे असून, बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले आहे. 

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com