Cabinet Expansion: शिंदे गटाच्या आमदारांचा जीव पुन्हा टांगणीला : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त 'या' कारणांमुळे पुन्हा हुकणार?

या सरकारमधील काही मंत्र्यांनीच विस्ताराला विरोध केल्याची चर्चा आहे.
Shinde-Fadnavis Government
Shinde-Fadnavis Government Sarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनाला जेमतेम १५ दिवस उरले असतानाही शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Cabinet expansion) साधी चर्चाही होताना दिसत नाही, त्यामुळे मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेले इच्छुक आमदार धास्तावले आहेत. अधिवेशनाआधी म्हणजे ५ ते ९ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटाने दिले होते. प्रत्यक्षात मात्र, या कालावधीतील मुहूर्त हुकण्याची चिन्हे दिसू लागली असून, या अधिवेशनाआधी विस्तार होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे, त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात नाराजीचा राजकीय भडका उडू शकतो. (Cabinet expansion of Shinde-Fadnavis government is going to fail again)

पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर सरकारचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगत, या सरकारमधील काही मंत्र्यांनीच विस्ताराला विरोध केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, नेमके कोणाला मंत्री करायचे, यावरून भाजपमध्ये निर्णय होत नसल्याने हा विस्तार रखडल्याकडे शिंदे गट बोट दाखवत आहेत. शिंदे गटातील नऊ मंत्र्यांना इतर सहकारी नको असल्यानेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

Shinde-Fadnavis Government
भाजपने वाढविले गवळी, बारणे, किर्तीकरांसह शिंदे गटाच्या पाच खासदारांचे टेन्शन

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ९ ऑगस्टला पहिला विस्तार करण्यात आला. त्यात, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या प्रत्येकी ९ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र शिवसेनेत बंड करताना शब्द देऊनही काही आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड झाली. त्या नाराज आमदारांची समजूत काढून मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार १५ सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे आणि भाजपकडून देण्यात आले होते. त्यानंतर ऐन दिवाळीत विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पण, हे दोन्ही मुहूर्त हुकले आहेत.

Shinde-Fadnavis Government
‘त्या’ बंडखोर १६ आमदारांना निलंबित करावेच लागणार : महाराष्ट्रातील बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

येत्या १५ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनाआधी विस्तार होणार असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले जात होते. त्यासाठी ५ ते ९ डिसेंबर या कालावधीतील मुहूर्त निवडला जाण्याचा अंदाज होता. मात्र, त्यादृष्टीने अजून तरी पावले टाकली जात नसल्याचा अंदाज आल्याने विशेषतः शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत भर पडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विस्तार होणार की नाही, याची उत्सुकता आहे. अधिवेशनाच्या आधी विस्तार होणार असल्याचे मानले जात आहे. या फेरीत मंत्रीपद मिळविण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातील इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com