भाजपकडून कंगनाचा पत्ता कट; लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा

कारगिल युध्दात सहभाग घेतलेले ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपकडून कंगनाचा पत्ता कट; लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा
Kangana Ranaut

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अभिनेत्री कंगना राणावतला उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, भाजपकडून कंगनाचा पत्ता कट करण्यात आला आहे. तिच्याऐवजी कारगिल युध्दात सहभाग घेतलेले ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून गुरूवारी देशातील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यादीत मंडी लोकसभेचे उमेदवार म्हणून खुशाल ठाकूर यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मंडी लोकसभेचे (Mandi Lok Sabha constituency) भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. मंडी लोकसभा जागेबरोबरच हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही ३० ऑक्टोबरला होणार आहे.

Kangana Ranaut
हा तर रडीचा डाव; जयंत पाटलांकडून बावनकुळेंना प्रत्युत्तर

मंडी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हीच्या नावाची चर्चा होती. कंगना राणावत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावातील आहे आणि तिने आपले नवीन घर मनालीमध्ये बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही या उमेदवारांबाबत चर्चा सुरू होती. मात्र, कंगनाने निवडणूक लढवण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली नव्हती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने कंगनाला (kangana ranaut) ODOP (वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट)ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे. कंगनानं योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं मुख्यमंत्र्यांनी कंगनाला दिलं.

निवडणूक आयोगानं ३ लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामध्ये मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आसाममधल्या ५, पश्चिम बंगाल मधल्या ४, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी २ मतदारसंघांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड आणि तेलंगणातील प्रत्येकी एका मतदारसंघातही याच दिवशी निवडणूका होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली असून ८ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Related Stories

No stories found.