Friendship Day चा BreakUp : पवारांनी जमवलेली महाविकास आघाडी फुटली!

Mahavikas Aghadi तील तीनही पक्षांच्या नेत्यांची तोंडे सध्या तीन दिशांना
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्प्रयासाने जमवून आणलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) फुटल्यात जमा असल्याचे चित्र आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. (Vice President Election 2022) या निवडणुकीत भाजपचे जगदिप धनखड हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बारा खासदारांनी त्यांनाच मतदान केले. शिवसेनेने काॅंग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला होता. मात्र ठाकरेंसोबत असलेल्या लोकसभेतील सहापैकी पाच खासदारांनी मतदानालाच जाणे टाळले. एकट्या ओमराजे निंबाळकर यांनी मतदान केले. Friendship Day च्या पूर्वसंध्येलाच आघाडीत ब्रेक अप झाला आहे.

Mahavikas Aghadi
Friendship Day : अबू आझमींच्या जिवलग मित्रांच्या यादीतील पहिले नाव म्हणजे गणेश गुप्ता

या खासदारांच्या अनुपस्थितीचा अर्थ आता लावण्यात येत आहे. गटनेते राजन विचारे, अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि संजय जाधव या पाच खासदारांनी या निवडणुकीत मतदान केलेले नाही. अशा महत्वाच्या निवडणुकीला अनुपस्थित राहून या खासदारांनी कोणते संकेत दिले आहेत, याविषयी वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत.

Mahavikas Aghadi
सेनेत पुन्हा भडका? : उपराष्ट्रपती निवडणुकीत पाच खासदारांनी मतदान टाळले..

काॅंग्रेससोबत जाण्याचे या खासदारांनी टाळल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या सर्व खासदारांनी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच मतदान केले. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा हे तृणमूल काॅंग्रेसचे होते. त्यांना काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा दिला होता. तेथेही महाविकास आघाडीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना गेली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तर काॅंग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. असे असूनही अल्वा यांना मतदान न होण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या खासदारांना उघडपणे काॅंग्रेससोबत जाणे अवघड वाटत असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि भाजपने शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्यावरून ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. हिंदुत्वाची व्होट बॅंक आपल्या हातून जात आहे, हे शिवसेनेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे थेट काॅंग्रेससोबत जाण्याचे टाळण्याची शक्यता दिसून येत आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीत राहण्यात शिवसेनेला स्वारस्य नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

Mahavikas Aghadi
'शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि ठाकरे यांचा उद्धव गट'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याविरोधात राष्ट्रवादीने प्रखर अशी प्रतिक्रिया दिली नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत थेट मत व्यक्त केलेले नाही. त्यामुळेच सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीचे वारू भरकटल्यासारखे झाले आहे. त्यातील तीनही पक्षाचे नेते सत्ता गेल्यानंतर एकदाही एकत्र भेटलेले नाहीत. एकत्रित कार्यक्रम किंवा आंदोलन तर झालेले नाही. उलट जो तो आपापले कार्यक्रम स्वतंत्रपणे करत आहे. महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे, हे स्पष्टपणे कोणी सांगत नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने ते दाखवून दिले आहे, हे मात्र नक्की!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com