चारशे वर्षांची परंपरा खंडीत... - Breaking the tradition of four hundred years  | Politics Marathi News - Sarkarnama

चारशे वर्षांची परंपरा खंडीत...

संजय जाधव 
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

नेहमीचं गोकुळ अष्टमीला भजन, कीर्तन, दशावतारी सोंग आदी कार्यक्रमामुळे उत्साहाचा खळखळून वाहणारा हा झरा आज शांत होता. 

बुलढाणा : कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. रोजगार, नोकरी, व्यवसायाला कोरोनामुळे फटका बसला आहे. सांस्कृतिक जीवनावर त्यांचा परिणाम झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील "नंदजी का उत्सव"यंदा रद्द करण्यात आल्याने 400 वर्षांची परंपरा यामुळे खंडीत झाली आहे. 

बुलढाणा जिल्हयातील आदिवासी भागातील वड़गाव वान नावाच गाव. येथे 400 वर्षापासून गोकुळ अष्टमीनिमित्त "नंदजी का उत्सव" साजरा करण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सात दिवस अनेकांना रोजगार मिळत होतो. लोककलावंत यात सामील होत होते. पण यंदा कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेहमीचं गोकुळ अष्टमीला भजन, कीर्तन, दशावतारी सोंग आदी कार्यक्रमामुळे उत्साहाचा खळखळून वाहणारा हा झरा आज शांत होता. 
 

हेही वाचा :‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन ; आता तरी धडा घ्या.. 

मुंबई : "राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा," असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून राजस्थानमधील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाना साधला आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच, असा इशारा देण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख