आदित्य ठाकरेंना आमदारही होऊ द्यायचे नाही? : भाजपची आतापासूनच तयारी..

Aditya Thackeray यांच्या वरळी मतदारासंघात भाजपचे दहीहंडीनिमित्त शक्तिप्रदर्शन
Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : Mumbai Politics मुंबई शहराध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती केल्यापासून भाजपने शिवसेनेला आव्हान देण्यास सुरवात केली आहे. त्यातही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघावर (Worli Assembly constituency) नियोजनबद्ध पावले टाकण्यात येत आहे. वरळीमध्ये भाजपने दहीहंडी भरवून ठाकरे यांना रान मोकळे मिळणार नसल्याचा इशारा दिला आहे.

ठाकरे कुटंबातील व्यक्तीने पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय आदित्य यांच्या रुपाने घेतला होता. त्यासाठी आदित्य यांना बऱ्याच राजकीय उलथापालथी कराव्या लागल्या होत्या. वरळीमध्ये राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांची ताकद होती. त्यांना शिवसेनेत घेतले. तसेच शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुनील शिंदे हे तिकिट कापल्यामुळे नाराज होऊ नये म्हणून त्यांनाही राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. शिंदे आणि अहिर हे दोघेही आता विधान परिषदेचे सदस्य बनले आहेत. आपल्या पर्यटनमंत्री पदाच्या काळात वरळी मतदारसंघात जास्तीचा निधी येईल याकडे आदित्य यांनी लक्ष दिले आणि तशी कामे करून घेतली.

Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची मोठी हंडी फोडली ; टेंभीनाक्यावरून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

2019 च्या निवडणुकीत आदित्य यांना 89,248 मते मिळाली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांना 21 हजार 181 मते घेता आली. आदित्य हे तब्बल 67,427 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

आता ठाकरे सरकार नसल्याने वरळीचा गड आपण घेऊ शकू, असा विश्वास भाजपला आहे. आदित्य यांच्याच मतदारसंघात आव्हान दिले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल, असेही भाजपला वाटते आहे. वरळी येथील जांबोरी मैदानावर भरविण्यात आलेल्या दहीहंडीच्या निमित्ताने अनेक भाजप नेते येऊन गेले. त्यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरे कुटुंबावर टीका केली. पण त्यातही नितेश राणे यांनी थेटपणे आदित्य यांना आव्हान दिले.

Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

नितेश राणे म्हणाले की जांबोरी मैदानात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे पाहून बर वाटलं. वरळी हा गड माणला जातो असे म्हणतात मात्र गड कसा सर करायचा हे आम्हा भाजपवाल्यांना माहित आहे. पेंग्विनला भायखळ्याच्या पिंजर्यात कसं बसवायचं हे आम्हाला माहित आहे. मुंबई कुठल्या साहेबांची नाही ही आपल्या सारख्या सर्वसामान्यांची आहे.

शिवसेनेचे कडवे विरोधक किरीट सोमय्या यांनीही या दहीहंडीला उपस्थिती लावून टोकदार भाषण केले. मी दहिहंडी फोडायला आलो आहे. मुंबई महापालिकेत जे माफिया राज सुरू आहे त्याचीही हंडी मीच फोडणार. मुंबई महापालिकेतील माफिया काॅन्ट्रेक्टरचीही हंडी फोडायची आहे, असे सोमय्या म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com