तावडे 'बाजीगर' ठरले पण विजयावरील प्रश्चचिन्ह कायम!

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) हे चंडीगडमध्ये प्रभारी आहेत.
Vinod Tawde
Vinod Tawde Sarkarnama

चंडीगड : आम आदमी पक्षाने (AAP) चंडीगड महापालिका (Chandigarh Municipal Corporation) निवडणुकीत मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या होत्या. मागील वेळी सत्तेत असलेल्या भाजपला (BJP) 'आप'ने दुसऱ्या क्रमांकावर फेकले होते. दुसऱ्या क्रमांकावर असूनही भाजपने 'आप'ला धक्का देत महापौरपद मिळवले आहे. महाराष्ट्रातील भाजप विनोद तावडे (Vinod Tawade) हे चंडीगडमध्ये प्रभारी आहेत. महापालिकेत सत्ता मिळवण्यात तावडेंचा मोठा वाटा असला तरी या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

भाजपच्या नगरसेवकांची संख्या आधीपेक्षा घटली असली तरी महापौर निवडीत तावडेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बाजी मारली आहे. चंडीगडमध्ये भाजपचा महापौर होण्याचा परिणाम पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीवरही पडेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला होता. परंतु, भाजपने घोडेबाजार करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा विजय मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे. चंडीगडमधील जनतेने 'आप'ला कौल दिला असतानाही भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे, अशी टीका 'आप'ने केली आहे. यावरून दोन्ही पक्षांतील आरोप-प्रत्यारोप सुरू असून, संख्याबळ कमी असतानाही भाजपने खेळी करून अखेर महापौरपद मिळवले हे सत्य आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे 7 आणि अकाली दलाचा एक असे आठ नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीत काँग्रेसची कोंडी झाली. कारण भाजपला हरविण्यासाठी ते आप'ला मतदान करू शकत नव्हते. भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा एक नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने संख्याबळ 13 वर गेले होते. भाजपच्या खासदार किरण खेर या महापालिकेच्याही पदसिद्ध सदस्य असल्याने भाजपला 14 मते मिळाली. आपच्या उमेदवारालाही 14 मते मिळाली मात्र, एक मत अवैध ठरवल्याने भाजपचा उमेदवार विजयी ठरला. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या सरबजीतकौर या महापौर झाल्या. त्यांना 14 मते मिळाली. 'आप'चा महापौरपदाचा उमेदवार एक मत अवैध ठरवण्यात आल्याने केवळ एका मताने हरला. भाजपने या निवडणुकीत काळाबाजार केल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

Vinod Tawde
भाजपचा विरोधकांना दे धक्का..कमी जागा असूनही महापौरपद मिळवलंच!

मागील महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाला एक जागा मिळाली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी तोडली होती. काँग्रेसला मागील निवडणुकीत 4 जागा मिळाल्या होत्या. या वेळी काँग्रेसने त्या आठवर नेल्या होत्या. चंडीगडमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दरवेळी दिसून येते. या वेळी मात्र अपवाद झाला असून, 'आप'ने मुसंडी मारली होती. पंजाबमधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आलेल्या असताना 'आप'ने आपली ताकद दाखवून दिली. यामुळे भाजपसह काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत आप, भाजप, काँग्रेस, अकाली दल - बहुजन समाज पक्ष आघाडी अशी चौरंगी लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com