नक्वी, अकबर, इस्लाम यांना डच्चू! राज्यसभेत आता भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसणार

लोकसभेत आधीच भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही
Mukhtar Abbas Naqvi, M J Akbar and Zafar Islam
Mukhtar Abbas Naqvi, M J Akbar and Zafar Islam Sarkarnama

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपने (BJP) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान राज्यसभा सदस्य असलेले केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi), सय्यद जफर इस्लाम आणि एम.जे.अकबर यांना डच्चू देण्यात आला आहे. यामुळे राज्यसभेत भाजपचा आता एकही मुस्लिम चेहरा असणार नाही. लोकसभेत आधीपासूनच भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही. (Rajya Sabha Election News Updates)

नक्वी हे झारखंडमधून मागील वेळी राज्यसभेवर (Rajya Sabha) गेले होते. आता त्यांना संधी देण्यात आलेली नाही. यामुळे नक्वी यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील यादीत नक्वी यांचे नाव असल्यास त्यांचे मंत्रिपद वाचू शकते. नक्वी यांच्यासोबत राज्यसभेचे विद्यमान सदस्य एम.जे.अकबर आणि सय्यद जफर इस्लाम यांनाही संधी देण्यात आली नाही. यामुळे भाजपकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व करणारे हे तिन्ही मुस्लिम चेहरे आता राज्यसभेत नसतील. लोकसभेतही भाजपचा एकही मुस्लिम चेहरा नाही. म्हणजेच भाजपचा आता एकही मुस्लिम संसद सदस्य असणार नाही.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने सहा मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरले होते. या सर्वांचा पराभव झाला होता. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत केवळ एक मुस्लिम लोकसभा सदस्य आहे. भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे मेहबूब अली कैसर हे लोकसभेवर निवडून आले आहेत. भाजपचा दोन्ही सभागृहात एकही मुस्लिम चेहरा नसला तरी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यांच्या सात जागा खाली आहेत. त्या जागेवर भाजपला मुस्लिम चेहऱ्याला संधी देता येऊ शकते. भाजप नेतृत्व असा निर्णय घेते का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर आणि विनय सहस्रबुद्धे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रातून उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनाही संधी देण्यात आली आहे. नक्वी यांच्याजागी झारखंडमधून भाजपचे सरचिटणीस आदित्य साहू यांना उमेदवारी मिळाली आहे. नक्वी यांना राज्यसभेवर संधी न मिळाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.

Mukhtar Abbas Naqvi, M J Akbar and Zafar Islam
आर्यनची अटक महागात! समीर वानखेडेंची अखेर उचलबांगडी

राज्यसभेच्या 15 राज्यांतील 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. यात सर्वाधिक म्हणजे आठ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भाजपने या राज्यातून आठ जणांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Mukhtar Abbas Naqvi, M J Akbar and Zafar Islam
राज्यसभेचा पत्ता कट होताच केंद्रीय मंत्री म्हणाले, आभारी आहे!

भाजपचे राज्यनिहाय उमेदवार ः मध्य प्रदेश – कविता पाटीदार, सुमित्रा वाल्मिकी, कर्नाटक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जग्गेश, लहरसिंह सिरोया, महाराष्ट्र – वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राजस्थान – घनश्याम तिवारी, उत्तर प्रदेश – लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधामोहन अग्रवाल, सुरेंद्रसिंह नागर, बाबूराम निषाद, दर्शना सिंह, संगीता यादव, मिथिलेश कुमार, के.लक्ष्मण, उत्तराखंड – डॉ. कल्पना सैनी, बिहार – सतीशचंद्र दुबे, शंभू शरण पटेल, हरियाना - कृष्ण लाल पवार, झारखंड - आदित्य साहू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com