Operation Lotus : भाजपच्या एकाच निशाण्यात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा बार!

BJP सोलापूरमधील समीकरणे बदलविणाऱ्या राजकीय घडामोडींना वेग
Babandada-Sanjay Shinde
Babandada-Sanjay Shindesarkarnama

पुणे : भाजपने आता ऑपरेशन लोटस (Operation Lotus) राज्यात राबविण्यास सुरवात केली नाही ना, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कट्टर मानले जाणारे आणि शरद पवार यांच्याविषयी सातत्याने आदर असल्याचे सांगणारे आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे दोघे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने सोलापूरमधील राजकीय समीकरणे बदलणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. या भेटीबाबत खुद्द बबनदादा यांनी काहीह सांगण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बबनदादा हे त्यांच्या कामानिमित्त फडणविसांना भेटल्याचा दावा केला. पण त्याबद्दलही बबनदादा शिंदे यांनी स्पष्टीकरण न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Babandada-Sanjay Shinde
मुख्यमंत्र्यांचे आठ तासांत उत्तर : शिवसैनिकांनी मोर्चा काढलेल्या खासदाराच्या घरी दिली भेट

माढा विधानसभा मतदारसंघात बबनदादा यांची ताकद आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तरी ते पुन्हा निवडून येऊ शकतात, याची खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. बबनदादा यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे देखील भाजपसोबत येऊ शकतात. संजय शिंदे हे अपक्ष असल्याने त्यांना भाजपसोबत येण्यात कोणतीच अडचण नाही. शिंदे यांच्याविरोधात ईडीची कारवाई देखील सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यातून दिलासा मिळण्याचा होरा शिंदे यांना असावा. त्यामुळेच भाजपने एकाच निशाण्यावर दोन आमदार खिशात टाकण्याचे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.

संजय शिंदे अपक्ष असले तरी हे आजही राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. मात्र त्यावरही अद्याप शिंदे बंधू यांच्याकडून खुलासा आलेला नाही.

Babandada-Sanjay Shinde
एकनाथ शिंदेंची भूक भागली नाही का? अजित पवारांचा हल्लाबोल

राजन पाटील यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणी पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबत केली नाही ना, असेही आता बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ झाल्यास नवल नाही. त्यामुळे बबनदादा यांनी जयंत पाटील यांना कितीही फोन करून सांगितले असले तरी प्रत्यक्षात आगामी काळात काय घडेल, हे सांगता येत नाही.

दरम्यान, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्थीने दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी खासदार निंबाळकर यांनी मोठी भूमिका निभावल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in