इतिहास घडला; भाजपला 334 पैकी 329 जागा, सीपीएम 3, टीएमसी 1 अन् काँग्रेस 0...

डाव्या पक्षांच्या गडाला भाजपनं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे.
BJP
BJPsarkarnama

आगरतळा : त्रिपुरातील (Tripura) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Civic Body Election) निवडणुकीत भाजपनं (BJP) इतिहास घडवला आहे. डाव्या पक्षांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं आपलं स्थान आणखी बळकट केलं आहे. डाव्यांसह तृणमूल काँग्रेसशी लढताना भाजपनं 334 पैकी 329 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 112 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आगरतळा महापालिकेतील सर्वच्या सर्व 51 वॉर्डांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसह तृणमूल व डाव्यांनाही इथे खातेही खोलता आले नाही. अगरतलासह सहा नगर पंचायत आणि 13 नगर परिषदांमध्येही भाजपचाच डंका आहे. डाव्यांना केवळ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तर पहिल्यांदाच त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्या तृणमूलला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

त्रिपुरामध्ये 25 नोव्हेंबर रोजी 222 जागांवर मतदान झाले होते. या निवडणुकीत तृणमुल व कम्युनिस्ट पक्ष भाजपच्या जवळपासही पोहचले नाहीत. काही ठिकाणी तर खातेही खोलता आलेली नाही. भाजपला 222 पैकी 217 जागांवर विजय मिळाला आहे. तर 112 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या विजयी उमेदवारांचा आकडा 334 पैकी 329 एवढा झाला आहे.

2018 मध्ये राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे गेले आहे. मुख्यमंत्री बिप्लव देव या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला आहे. मागील निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तर डाव्या पक्षांनी बहुतेक संस्थांमध्ये विजय मिळवला होता. 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जात होते. त्यामध्ये भाजपने बाजी मारत विरोधकांना धूळ चारली आहे.

त्रिपुरा राज्यात भाजपची सत्ता आहे. पण येथील आगरतळा महापालिकेस इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तृणमूलने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या राज्यात 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. भाजपसह काँग्रेसमधील काही नेत्यांनाही त्यांना गळाला लावले आहे. तसेच निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही तृणमूलने उचलून धरला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा मुद्दा पोहचला होता. त्यामुळे या निवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com