BJP
BJPsarkarnama

भाजपचं सोशल इंजिनिअरींग! राज्यसभेला निम्म्याहून अधिक जागांवर ओबीसी अन् दलित

जातिनिहाय जनगणनेची मागणी सुरू असतानाच तब्बल 9 ओबीसी उमेदवार

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपने (BJP) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत भाजपनं सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे. भाजपनं निम्म्यापैकी अधिक जागांवर ओबीसी आणि दलित उमेदवारांनी संधी दिली आहे. जातिनिहाय जनगणनेच्या मागणी जोर धरू लागला असून, यात तब्बल नऊ ओबीसींनी संधी दिली आहे. (Rajya Sabha Election News Updates)

उत्तर प्रदेश दलित-ओबीसी मतदारांनी साथ दिल्यामुळं पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळाली आहे. याचाच विचार राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी देताना करण्यात आला आहे. भाजपने 22 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात सहा महिला आहेत. यातून मोदी सरकारचा महिला सक्षमीकरणावरील भर दाखवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात 8 पैकी दोन जागी उच्चवर्णीय आणि सहा जागांवर मागास वर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. बिहारमध्ये एक ब्राह्मण आणि एक ओबीसी चेहरा देण्यात आला आहे.

कर्नाटकात केंद्रीय निर्मला सीतारामन यांना उमेदवारी देतानाच वक्कलिग समाजातील अभिनेते जगदीश आणि माजी खजिनदार लहरसिंह सिरोया यांना संधी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशात दलित आणि ओबीसी समाजातील महिलांना उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर उत्तराखंडमधील महिला उमेदवार या मागास वर्गातील आहेत. याचबरोबर महाराष्ट्रात अनिल बोंडे या ओबीसी समाजातील नेत्यालाही उमेदवारी देण्यात आली आहे. हरियानात एका दलित नेत्याला तर झारखंडमध्ये ओबीसी नेत्याला जागा मिळाली आहे.

BJP
नक्वी, अकबर, इस्लाम यांना डच्चू! राज्यसभेत आता भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसणार

राज्यसभेच्या 15 राज्यांतील 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. यात सर्वाधिक म्हणजे आठ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भाजपने या राज्यातून आठ जणांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP
भाजपनं टाकला डाव! चौथ्या जागेसाठी सुभाष चंद्रा यांना उतरवलं मैदानात

भाजपचे राज्यनिहाय उमेदवार ः मध्य प्रदेश – कविता पाटीदार, सुमित्रा वाल्मिकी, कर्नाटक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जग्गेश, लहरसिंह सिरोया, महाराष्ट्र – वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राजस्थान – घनश्याम तिवारी, उत्तर प्रदेश – लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधामोहन अग्रवाल, सुरेंद्रसिंह नागर, बाबूराम निषाद, दर्शना सिंह, संगीता यादव, मिथिलेश कुमार, के.लक्ष्मण, उत्तराखंड – डॉ. कल्पना सैनी, बिहार – सतीशचंद्र दुबे, शंभू शरण पटेल, हरियाना - कृष्ण लाल पवार, झारखंड - आदित्य साहू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com