निवडणुकीची रणधुमाळी : 'आत्मनिर्भर बिहार'वर भाजपचा जोर

बिहार निवडणुकीच्याप्रचारातील ज्या मुद्याबाबत राज्यातील सर्वच पक्षांना सर्वाधिक जनप्रतिसादाची अपेक्षा आहे त्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा ठळक उल्लेख भाजपच्या मसुद्यात नसेल, तरी प्रचारात तो मुद्दा तापणार हे उघड आहे, असे दिल्लीतील पक्ष सूत्रांनी सूचीत केले
निवडणुकीची रणधुमाळी : 'आत्मनिर्भर बिहार'वर भाजपचा जोर
BJP To Press Atmanirbhar Bihar issue in Elections

नवी दिल्ली  : बिहारमध्ये दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्ष नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) व 'आत्मनिर्भर बिहार-आत्मनिर्भर भारत' या दोन ठळक मुद्यांभोवती पक्षाच्या प्रचाराचे अधिकृतरीत्या सूत्र गुंफणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार संजय जयस्वाल यांनी ही माहिती दिली.

प्रचारातील ज्या मुद्याबाबत राज्यातील सर्वच पक्षांना सर्वाधिक जनप्रतिसादाची अपेक्षा आहे त्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा ठळक उल्लेख भाजपच्या मसुद्यात नसेल, तरी प्रचारात तो मुद्दा तापणार हे उघड आहे, असे दिल्लीतील पक्ष सूत्रांनी सूचीत केले. सत्तारूढ संयुक्त जनता दल-भाजप युती आणि विरोधक असलेल्या राष्ट्रीय जनता दल आघाडीमधील हालचाली वेगवान झाल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे खासदार पुत्र चिराग पासवान यांच्याकडे विरोधक आशेने पहात आहेत, हाही यावेळचा चक्रावणारा घटक दिसत आहे. 
भाजप आघाडी अभेद्य असल्याचे पक्षाकडून सांगितले जाते. 

भाजपच्या निवडणूक मुद्यांबाबत जयस्वाल म्हणाले,  ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तयार केलेली एनईपी व आत्मनिर्भर भारत मोहीम आमच्यासाठी प्रचाराचे केंद्रबिंदू रहातील. भविष्यातील सशक्त राष्ट्रनिर्माणाची क्षमता असलेल्या या दोन मुद्यांचे महत्व भाजप वक्ते बिहारच्या जनतेला प्रचारात समजावून सांगतील. विशेषतः ८ व्या वर्षापासूनच राज्यातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणासारख्या सुविधा मिळणे सोपे जाणार असून त्यातून तरुणांमध्ये कौशल्य विकासाचे मोठे उद्दिष्ट साध्य होणार आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अतिशय दूरगामी बदल घडवून आणणारे हे शिक्षण धोरण असेल असे आम्ही राज्यातील जनतेला पटवून देणार आहोत.'' 


भाजपचे निवडणुकीसाठी संभाव्य मुद्दे 

►नव्या उद्योजकांसाठी केंद्राच्या २० लाख कोटींच्या विशेष पॅकेजचा मोठा लाभ बिहारला 

►फक्त बिहारसाठी केंद्राचे दीड लाख कोटींचे विशेष पॅकेज 

►लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमुळे स्थलांतरित मजुरांना मोठा फायदा 

► आगामी काळात 'आत्मनिर्भर बिहार'ची मोठी भूमिका
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in