Maharashtra Politics : भाजपने वाढवले अमोल कोल्हे अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचे टेन्शन

Maharashtra Politics : पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात जे पी नड्डा जाहीर सभा घेणार
shivajirao adhalrao patil, JP Nadda, Amol Kolhe
shivajirao adhalrao patil, JP Nadda, Amol KolheSarkarnama

गणेश ठोंबरे

Maharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे शिरुरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून भाजपचा वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न आहे. शिरुरची जागा ही शिवसेनेची आहे. आता ती जागा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीमध्ये शिंदे गटाकडे जायला हवी. मात्र भाजप येथे वातावरण निर्मीती करत असल्याने माजी खासदार आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले असल्याचे बोलले जात आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यासाठीही हा इशारा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. तसेच भोसरीचे आमदार व भाजप नेते महेश लांडगेही लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरमधून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यातच जे पी नड्डा यांची सभा होणार असल्याने आढळरावांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

भाजपने देशात 'मिशन १४४'च्या तयारीला महाराष्ट्रातून सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतल्या आहेत. तर आता नड्डा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून ते पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात जाहीर सभा घेणार आहेत.

मात्र, भाजपच्या 'मिशन १४४'चा फटका आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी आत्तापासून सुरु केलीय.

त्यामध्ये देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघ देखील आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील याचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.

shivajirao adhalrao patil, JP Nadda, Amol Kolhe
Sharad Pawar : "स्वत:च्या राज्यात ज्यांना..." पवारांनी काढला नड्डांना चिमटा!

खरं तर शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचा आजी आणि माजी खासदार देखील नाही. पण तरी देखील भाजपने येथे कंबर कसली आहे. एवढंच नाही तर भाजप २०२४ च्या लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी देखील करत असल्याची चर्चा आहे. या मतदार संघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सभा घेत असल्याने येणाऱ्या काळात लोकसभेसाठी भाजप येथे उमेदवार उभा करणार असल्याचं बोललं जात आहे.

शिरूर मतदार संघात सध्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. तर त्या आधीच्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil )हे खासदार होते. त्यामुळे येथे राष्ट्रवादीची आणि शिवसनेनेची मोठी ताकद आहे. मात्र त्यांना भाजप तोडीस-तोड टक्कर देण्याची शक्यता आहे.

shivajirao adhalrao patil, JP Nadda, Amol Kolhe
Laxman Jagtap passed away : जगतापांच्या अंत्ययात्रेला लोटला हजारोंचा जनसागर; लक्ष्मण भाऊंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भाजपमध्ये जाण्याची चर्चा ही अकारण....

मध्यंतरी अमोल कोल्हे हे (Amol Kolhe) भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र याबाबत बोलताना त्यांनी 'भाजपमध्ये जाण्याची चर्चा ही अकारण असून लोकसभेची निवडणूक ही २०२४ साली आहे. आभाळ कानी वारा पाहून शेत नांगरायला घेतात. शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून उगाच आउत खांद्यावर घेऊन फिरत नाही, अकारण चर्चा घडवण्यात काही अर्थ नाही', असं सांगत त्यांनी आपल्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं होतं.

दरम्यान, भाजप शिरूर मतदार संघात जे पी नड्डा यांच्या सभेच्या माध्यमातून खासदार आमोल कोल्हे आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना थेट आव्हान देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपने आमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचं टेन्शन वाढवलं यात शंका नाही.

shivajirao adhalrao patil, JP Nadda, Amol Kolhe
Legislative Council Election : कॉंग्रेसच्या तांबेंना रोखण्यासाठी भाजपची खेळी; मोठा नेता उतरवणार मैदानात?

नड्डांची २० जानेवारीला होणार सभा

जे पी नड्डा हे २० जानेवारीला पुणे (Pune) दौऱ्यावर येणार असून ते पुण्यातील शिरुर मतदारसंघात सभा घेणार आहेत. याबाबची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. त्यामुळे या सभेत नड्डा नेमकी काय बोलतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

भाजपचे 'मिशन १४४' नेमकी काय आहे?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने 'मिशन १४४' सुरु केलं आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला विजय मिळालेला नव्हता अशा देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत करण्यास सुरू केलं आहे.

याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते या १४४ मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद आणि चंद्रपूर येथे नड्डा यांची सभा झाली. तर आता नड्डा शिरुर मतदारसंघात सभा घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com