बंगालच्या हिंसाचारावर नड्डा म्हणाले, फाळणीनंतर पहिल्यांदाच असं घडलं!

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला असून, यात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत.
bjp national president j p nadda condemns west bengal violence
bjp national president j p nadda condemns west bengal violence

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला असून, यात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. याची दखल घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तातडीने दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर दाखल झाले आहेत. बंगालमधील हिंसाचाराची तुलना त्यांनी फाळणीनंतरच्या हिंसाचाराशी केली आहे. (bjp national president j p nadda condemns west bengal violence)

बंगालमधील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेला भाजप पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तातडीने दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. नड्डा हे राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेण्यासोबत हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

कोलकत्यात आगमन झाल्यानंतर नड्डा म्हणाले की, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर घडत असलेल्या घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. मी भारताच्या फाळणीवेळी अशा घटना घडल्याचे ऐकले होते. भारत स्वतंत्र झाल्यापासून निकालानंतरची एवढी मोठी असहिष्णूता मी पहिल्यांदाच पाहत आहे. 

आम्ही वैचारिक लढाई लढण्यास तयार आहोत. तृणमूलच्या कारवाया बेकायदा आणि असहिष्णू आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने लढण्यास तयार आहोत. मी दक्षिण 24 परगण्यात जाणार आहे. तेथे मी हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार आहे, असे नड्डा म्हणाले. 

राज्यातील सहा जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचारात 8 जणांची हत्या झाली असून, यात भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असा दावा भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसने हा हिंसाचार केल्याचा आरोप भाजपने केला आहे.  दरम्यान, कोलकत्यात एक आणि सोनारपूरमध्ये एक असे दोन जण ठार झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने मात्र, आपल्याच दोन कार्यकर्त्यांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचा दावा केला. आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com