भाजपनं डच्चू दिलेल्या वरूण गांधींचे वाजपेयींच्या आडून पक्षालाच आव्हान

लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेचे व्हिडीओ ट्विटवर शेअर करत भाजपचे खासदार वरूण गांधींनी पक्षालाच अडचणीत आणले होते.
भाजपनं डच्चू दिलेल्या वरूण गांधींचे वाजपेयींच्या आडून पक्षालाच आव्हान
Indira Gandhi and Atal Bihari Vajpayee

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेचे व्हिडीओ ट्विटवर शेअर करत भाजपचे खासदार वरूण गांधींनी (Varun Gandhi) पक्षालाच अडचणीत आणले होते. त्यांच्या ट्विटनंतर काही तासांतच त्यांना भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले. आता त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा व्हिडीओ ट्विट करीत थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.

वरुण गांधींनी आज वाजपेयींची एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात वाजपेयी हे शेतकऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या सरकारला इशारा देताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, सरकारने शेतकऱ्यांना धमकावू नये. तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी तुम्हाला घाबरणार नाहीत. आम्हाला राजकीय कारणांसाठी शेतकरी आंदोलनाचा वापर करायचा नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत आहोत. सरकारने आम्हाला घाबरवण्याचा अथवा शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कायद्याचा गैरवापर केल्यास आम्हीही आंदोलनात उतरू.

वाजपेयींचा हा व्हिडीओ 1980 मधील आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारकडून त्यावेळी शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. यावरून वाजपेयींनी सरकारला थेट इशारा दिला होता. वरुण गांधींनी हा व्हिडीओ ट्विट करून शेतकरी आंदोलनावर बळाचा वापर करणाऱ्या भाजप नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. कार्यकारिणीमधून वगळण्यात आल्यानंतर आता वरूण गांधींनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे.

Indira Gandhi and Atal Bihari Vajpayee
मोदींच्या नावावर मते मिळण्याची गॅरंटी नाही! केंद्रीय मंत्र्याने टाकला बॉम्ब

भाजपने नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून वरूण गांधींसह त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही वगळण्यात आले. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आले. वरूण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर सातत्याने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी घटनेचे दोन व्हिडीओ ट्विटवर शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करत त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना अडचणीत आणले होते.

Indira Gandhi and Atal Bihari Vajpayee
काँग्रेस नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीच्या चर्चेवर येडियुरप्पांनी मौन सोडलं अन् म्हणाले...

कार्यकारिणीतून वगळल्यानंतर वरूण गांधी यांनी लखीमपूर घटनेवर पुन्हा ट्विट केले होते. लखीमपूर खीरी येथील हिंसेनंतर या प्रकरणाला हिंदू विरूद्ध असे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून लोकांना भ्रमित करणाचा प्रयत्न आहे. अशाप्रकारचं वागणं धोकादायक आहे. यामुळे पुन्हा एकदा जखमा ताज्या होतील. राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय एकता पणाला लावू नये, असं गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होते.

Related Stories

No stories found.