न्यायालयात आजारी असल्याचे सांगणाऱ्या भाजप खासदार लग्नात नाचताना दिसल्या (व्हिडीओ व्हायरल) - bjp mp pragya thakur seen dancing in marriage ceremony | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

न्यायालयात आजारी असल्याचे सांगणाऱ्या भाजप खासदार लग्नात नाचताना दिसल्या (व्हिडीओ व्हायरल)

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या कायम वाद ओढवून घेत असतात. त्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी आहेत. 

भोपाळ : भाजपच्या (BJP) खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Thakur) या कायम वाद ओढवून घेत असतात. त्या मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blasts) खटल्यात आरोपी आहेत. या खटल्याच्या सुनावणीस प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहण्यापासून मुभा त्यांनी अनेक वेळा मागितली आहे. असे असताना त्या आता एका लग्नात चक्क नाचताना दिसल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्या बास्केटबॉल खेळत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. 

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती. नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2017 जामीन मंजूर झाला होता. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघातून उभे राहात  काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा पराभव केला होता. त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा विजय मिळवला होता. 

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी अनेक वेळा प्रज्ञा यांनी केली आहे. असे असताना आता त्या लग्नात नाचत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा विवाह समारंभ त्यांच्याच निवासस्थानी झाला होता. गरीब कुटुंबातील दोन जुळ्या मुलींचा हा विवाह समारंभ होता. या वेळी 51 वर्षांच्या प्रज्ञा या नाचताना दिसल्या. 

काँग्रसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी प्रज्ञा या नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या कायम व्हिलचेअरवर न्यायालयात जाताना दिसतात. त्यामुळे सलूजा यांनी प्रज्ञा यांची फिरकी घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना बास्केटबॉस खेळताना, कुणाचा आधार न घेता चालताना आणि असे आनंदाने नाचताना पाहून खूप बरे वाटते ना.

हेही वाचा : नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारला अन् 24 तासांत पेट्रोल, डिझेलचा रेकॉर्ड 

काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकूर या बास्केटबॉल खेळताना दिसल्या होत्या. याचा व्हिडीओही सलूजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी म्हटले होते की, भोपाळच्या भाजप खासदार साध्वी ठाकूर यांना आतापर्यंत व्हीलचेअरवर पाहिले होते. परंतु, त्यांना आज भोपाळध्ये बास्केटबॉल कोर्ट खेळताना पाहिले आणि खूप आनंद झाला. आतापर्यंत आम्हाला वाटत होते की त्यांना काही तरी आजार असून, त्यांना उभे राहता येत नाही. ईश्वराने त्यांना सदैव निरोगी ठेवावे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख