पंकजा मुंडेंसाठी भाजपच्या सुरेश धसांसह तीन आमदार मैदानात...राज्यपालांकडे घेतली धाव

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर पोलिसांना गुन्हे दाखल केले होते. यावरुन भाजपचे आमदार आक्रमक झाले आहेत.
bjp mlas demand of withdrawal of cases registered against pankaja munde
bjp mlas demand of withdrawal of cases registered against pankaja munde

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑनलाइन दसरा मेळावा घेतला होता. हा मेळावा ऑनलाइन असला तरी गर्दी जमवून नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आले होते. याप्रकरणी पंकजा मुंडेंसह एक खासदार, दोन आमदार अन् माजी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पंकजा मुंडेवरील गुन्हा मागे घ्यावेत, यासाठी भाजपच्या आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धाव घेतली आहे.  

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे मागील वर्षी  25 ऑक्टोबरला दसरा मेळावा झाला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑनलान मेळावा झाला होता. त्यावेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, भिमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदडा, केशव आंधळे आदी उपस्थित होते. 

हा मेळावा ऑनलाइन असल्याने नागरिकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पंकजा यांच्यासह मेळाव्याला उपस्थित इतर नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. यामुळे पोलिसांनी पंकजा मुंडे, खासदार कराड, आमदार राजळे, बोर्डीकर आणि जानकर यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, कलम 51(ब) आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर, दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजप आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना नुकतेच निवेदन दिले आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार , आमदार नमिता मुंदडा, भाजप नेते अक्षय मुंदडा यांचा समावेश आहे. केवळ राजकीय सूडबुद्धीने हे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. 

पंकजा मुंडे यांनी सावरगावघाट येथे ऑक्टोबर महिन्यात ऑनलाइन दसरा मेळावा घेतला त्याच दिवशी व आजही बीड जिल्ह्यात तसेच राज्यात अनेक ठिकाणी गर्दी असलेले जाहीर कार्यक्रम होत आहेत. त्याची सर्व माहिती व पुरावे पोलिसांना देऊनही केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन सूडबुद्धीने फक्त पंकजा मुंडे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देऊन पंकजा मुंडेंवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com