शनिवारी सिद्धीविनायकाला जाणार, अडवून दाखवा : राम कदमांचा इशारा - BJP Mla Ram Kadam Challeges government for Siddhivinayak Darshan | Politics Marathi News - Sarkarnama

शनिवारी सिद्धीविनायकाला जाणार, अडवून दाखवा : राम कदमांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

कोरोना मुळे लावाव्या लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळापासून देशभरातील देवस्थाने बंद आहेत. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आहेत. त्यामुळे कोरोना महामारी मुळे गेल्या पाच महिन्यांन पेक्षा जास्त काळ बंद असलेली महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे.

मुंबई : येत्या शनिवारी मी मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदीरात दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मला अडवण्याची हिंमत करु नये, असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षाबरोबरच आता शिवसेना आमदारही राज्यातली मंदीरे उघडण्याची मागणी करु लागले आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहीले आहे.

कोरोना मुळे लावाव्या लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळापासून देशभरातील देवस्थाने बंद आहेत. आता अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आहेत. त्यामुळे कोरोना महामारी मुळे गेल्या पाच महिन्यांन पेक्षा जास्त काळ बंद असलेली महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे.

यासाठी वंचित बहुजन आघाडी व भाजपाच्या वतीने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरखुले करण्यासाठी आंदोलनाची हाक देखील देण्यात आली आहे. तर शिर्डी संस्थानच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. आता तर शिवसेनेच्या आमदारांनी देखील मंदिरांचे अर्थचक्र सुरु व्हावे व शेकडो जणांची उपजीविका भागवली जावी, यासाठी मंदिर उघडी करावीत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे.

शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन हिंगोली मधील औंढा येथील आठवे ज्योतिर्लिंग हे मंदिर खुले करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मंदिर उघडण्याची परवानगी दिल्यास सर्व नियमांचं पालन करून मंदिर भाविकांसाठी उघडणार असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितले आहे.  काही दिवसांपूर्वी नाशिक येथील देवस्थानांच्या पुजाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून राज्यातील मंदीरे सुरु करण्याबाबत साकडे घातले होते. राज यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख