तुमचे मंत्री नार्को टेस्ट करतील काय? राम कदमांचे सचीन सावंतांना प्रत्त्युत्तर  - BJP Mla Ram Kadam Answers Sachin Sawant Tweets | Politics Marathi News - Sarkarnama

तुमचे मंत्री नार्को टेस्ट करतील काय? राम कदमांचे सचीन सावंतांना प्रत्त्युत्तर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

सुशांतसिंगराजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया याना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला . या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची  प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिलीं हेच सरकारच्या जिव्हारी लागलं, असे राम कदम यांनी म्हटले आहे

मुंबई : छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे. उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. मी तयार आहे. पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा," असा टोला लगावत भाजप आमदार राम कदम यांनी सचीन सावंत यांना उत्तर दिले आहे. 

सुशांतसिंगराजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया याना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला . या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची  प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिलीं हेच सरकारच्या जिव्हारी लागलं, असेही राम कदम यांनी म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाविकास आघाडीच्या बड्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजप सुरुवातीपासून करत आहे. त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आहे. 

विवेक मोईत्रा (दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक)यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील,'' अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनी ट्वीटद्वारे केली आहे, त्याला कदम यांनी उत्तर दिले आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनाने बाॅलीवूडबाबत उघड भूमीका घेतली आहे. बाॅलीवूडमधील ड्रग माफियांविरोधातही तिने भाष्य केले होते. त्यानंतर एक ट्वीट करत तिने संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, आपल्याला केंद्र सरकार किंवा हरयाणा सरकारने सुरक्षा पुरवावी असे म्हणत तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेणार नाही, असे जाहीर केले होते, त्यावरुन आता राजकीय वाद उफाळले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख