पूनावाला तर दरोडेखोरापेक्षाही वाईट, सिरम कंपनी ताब्यात घ्या! भाजप आमदाराची मागणी - bjp mla radha mohan das says adar poonawalla is worst than dacouit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

पूनावाला तर दरोडेखोरापेक्षाही वाईट, सिरम कंपनी ताब्यात घ्या! भाजप आमदाराची मागणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 एप्रिल 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात मागील 24 तासांत 3 लाख 14 हजार नवीन रुग्ण सापडले असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे.  

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना सिरमकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लस राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित करीत सिरमच्या अदर पूनावालांना भाजप आमदाराने दरोडेखोराची उपमा देऊन सिरम कंपनी सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अर्थ मंत्रालयाने कोरोना लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. याअंतर्गत राज्य सरकारे, खासगी रुग्णालये आणि लसीकरणे केंद्रे थेट कोरोना लशीची खरेदी करु शकतात. पुढील दोन महिन्यांत सिरमने उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्मय घेतला आहे. लशीच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला आणि उरलेले 50 टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे, असे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.  

यासाठी सिरमने दरपत्रक जाहीर केले आहे. कोव्हिशिल्ड लशीच्या एका डोससाठी राज्यांना 400 रुपये मोजावे लागतील. याचवेळी खासगी रुग्णालयांना यासाठी 600 रुपये द्यावे लागतील. पुढील 4 ते 5 महिन्यांत ही लस किरकोळ विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. 

यावर भाजपचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे आमदार राधामोहन दास यांनी थेट अदर पूनावाला यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी पूनावालांची तुलना दरोडेखोराशी केली असून, महामारी कायद्यांगर्तत त्यांची कंपनी ताब्यात घ्यावी, अशी मागणीही केली आहे. त्यांनी संदर्भात ट्विट केले असून, यात त्यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री बी.एल. संतोष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना टॅग केले आहे. 

विशेष म्हणजे आमदार दास हे स्वत:ही डॉक्टर आहेत. त्यांनी लशीच्या किमतीसाठी स्वामिनाथन आयोगाचा फॉर्म्युला सांगितला आहे. खर्चाच्या आधारावर किंमत आकारावी, असे त्यांनी सुचवले आहे. खर्चाच्या जास्तीत जास्त 50 टक्के नफा धरुन किंमत धरावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख