तालिका अध्यक्षपदी सोंगाड्याला बसवून खुर्चीचा अपमान! जाधवांवर नितेश राणे घसरले

भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या बारा सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यावरुन गदारोळ सुरू झाला आहे.
bjp mla nitesh rane targets shivsena mla bhaskar jadhav
bjp mla nitesh rane targets shivsena mla bhaskar jadhav

मुंबई : विधिमंडळात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या (BJP) बारा सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यावरून भाजपचे (BJP) आमदार नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भास्कर जाधवांवर जहरी टीका केली आहे. जाधव हे नरकासूर असून सोंगाड्या आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे.

भास्कर जाधव हे कोकणातील असून, त्यांच्याविरोधात आता भाजपच्या राणे पितापुत्रांनी आघाडी उघडली आहे. खासदार नारायण राणे यांच्यानंतर त्यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधवांवर काल टीका केली होती. आज राणेंचे दुसरे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाधवांवर हल्लाबोल केला. त्यांनी जाधवांची तुलना नरकासुराशी करीत त्यांना सोंगाड्याची उपमा दिली. 

नितेश राणे म्हणाले की,  आम्ही कोकणातले आहोत तसे जाधवही कोकणातले आहेत. कोकणात दशावतार असतात आणि त्यात नरकासूर असतो. तो वेगवेगळे सोंगे बदलतो.  त्यात सोंगाड्याही असतो . भास्कर जाधवांना ओळखणाऱ्यांना ते  कसे सोंगाड्या आहेत, हे माहिती आहे. ते नरकासुरासारखे असून, ते एकच सोंग कायम ठेवत नाहीत. जाधवांना कोणीही शिवी दिली नव्हती. कोणीही काहीही केलं नाही. तमाशातील सोंगड्या कसा असतो,  नरकासूर कसा असतो तसे भास्कर जाधव आहेत. 

आमच्यासारखे लोक जाधवांना चांगलं ओळखून आहेत. ते काय काय करतात ते आम्हाला माहिती आहे. तालिका अध्यक्षांच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला. मला आश्चर्य वाटते की ते रडले का नाहीत? त्यांनी स्वत:चे कपडे फाडले नाहीत. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात. भास्कर जाधवांप्रमाणे मुख्यमंत्रीही सोंगाड्या आहेत. एक सोंगाड्या वर बसलेला होता आणि दुसरा खाली. मुख्यमंत्री सभागृहात काहीच बोलत नाही, कारण तेही सोंगाड्याच्या भूमिकेत आहेत, असेही राणे म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांत काल (ता.5) जोरदार चकमक झाली. काही सदस्यांनी डायसवरून माईक हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये बैठक झाली. तेथे जाधव यांना शिवीगाळ झाली. या प्रकरणी भाजपचे आमदार गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, राम सातपुते, जयकुमार रावळ, नारायण कुचे, किर्तीकुमार बांगडिया, पराग आळवणी, हरिष पिंपळे, योगेश सागर यांना एक वर्षासाठी निलंबित कऱण्यात आले. तसेच त्यांना मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनाच्या आवारात येण्यास मनाई घातली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com