पडळकर-खोत जोडी पुन्हा ठरली हीट; सरकारला तिसऱ्यांदा गुंगारा देण्यात यशस्वी!

भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत नियमित आंदोलनांमध्ये पुढे असतात.
Gopichand Paealkar, Sadabhau Khot
Gopichand Paealkar, Sadabhau Khotsarkarnama

मुंबई : भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत नियमित आंदोलनांमध्ये पुढे असतात. पोलिस आणि सरकारला चुकवून आंदोलन यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पडळकर आणि खोत यांनी आंदोलन हातात घेतले की त्याला प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात मिळते. एसटी, विद्यार्थी, उस एफआरपी आंदोलन, बैलगाडा शर्यत आणि पुतळ्याचे उद्घाटन यामध्ये त्यांनी सरकारला अनेकवेळा गुंगारा दिला आहे.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून सांगलीत आज चांगलेच राजकारण रंगले. या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी पडळकर आणि खोत (Sadabhau Khot) हजारो कार्यकर्त्यांसह सांगलीत (Sangli) दाखल झाले. त्यानंतर मोर्चा काढत ते स्मारकाकडे जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र, पडळकरांनी स्माराकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी केली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही पडळकर यांनी वेगळ्या पद्धतीने स्माराकावर पुष्पवृष्टी केली. याची चर्चा राज्यभर रंगली आहे.

Gopichand Paealkar, Sadabhau Khot
आता माझी बायकोही म्हणेल आपण नव्यानं लग्न करू : अजितदादांची भरसभेत मिश्किली!

गेल्या वेळीही जेजुरीतील अहल्यादेवींच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद पेटला होता. पुतळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रसेचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि होळकरांचे वंशज यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्घाटनाला विरोध केला होता. पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. पडळकरांनी हार न मानता भल्या पहाटे लोक आणि पोलीस बेसावध असताना पुतळ्याचे लोकार्पण केले.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली नव्हती. तेव्हा आम्हाला बैलगाडा शर्यत भरवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पडळकर यांनी केली, आणि शर्यतीचे आयोजन केले. सरकारने या आयोजनाला परवानगी दिली नाही. पोलिसांनी बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर खड्डेही खोदले. पडळकर यांनी शर्यतीच्या ठिकाणी येवून नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला. तेव्हाही पडळकारांनी हार न मानता, ठरललेल्या दिवशीच पोलीस माळरानावर पाहरा देत असतानाही पहाटे दुसऱ्याच माळरानावर शर्यत भरवली.

आजही सांगलीत तेच झाले. पडळकर यांनी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करायला विरोध करत शड्डू ठोकला. उद्घाटन हे मेंढपालांच्या हस्ते होणार अशी भूमिका घेतली. हजारो कार्यकर्त्यांसह सदाभाऊ खोत यांना सोबत घेऊन सांगलीला पिवळे करून सोडले. शेवटी पडळकरांनी सरकारला दिलेले आव्हान खरे करत पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.

Gopichand Paealkar, Sadabhau Khot
ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत अहल्यादेवींच्या स्मारकाचे उद्घाटन केले : पडळकरांचा दावा

जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी येणाऱ्या २ एप्रिलपर्यत स्मारक परिसरातील शंभर संचारबंदी लागू केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच बंदोबस्ताला सुरवात झाली होती. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून आवश्यक रस्ता वगळता अन्य शंभर मीटर हद्दीतील रस्ते अडथळ्याद्वारे बंद करण्यात आले होते. स्मारकाच्या सभोवताली उंच लोखंडी पत्रे उभारून सर्व बाजू झाकण्यात आल्या होत्या. स्मारकस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शनिवारपासून बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला होता. राखीव दलाच्या जवानांच्या दोन तुकड्याही स्मारकस्थळी दाखल झाल्या होत्या. पोलिसांचा ताफा स्मारकस्थळी कडेकोटपणे बंदोबस्त बजावत होते. तरीही पडळकर यांनी आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com