bjp mla ashish shelar action aganist adani by state government
bjp mla ashish shelar action aganist adani by state government

अदानींवरील कारवाईसाठी आता भाजपचे आशिष शेलार उतरले मैदानात

अदानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असेल तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मुंबई विमानतळाला देण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात झाला. त्यांचे नाव बदलण्यास भाजपचा विरोध असणार आहे. मात्र, हे विमानतळ अदानी (Adani) यांना देखरेखीसाठी देताना नाव टाकण्याबाबत राज्यातील ठाकरे सरकारने अट का घातली नाही? अदानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असेल तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल भाजप (BJP) नेते व आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केला आहे. 

आमदार आशिष शेलार तीन दिवस खानदेश दौऱ्यावर आहेत. आज ते जळगाव जिल्ह्यात होते. त्यांनी भाजप कार्यालयात बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई विमानतळ देखभाल करण्यासाठी हस्तांतरित करताना राज्य सरकारने नाव टाकण्याबाबत अटी शर्ती टाकून तसा ठराव मंजूर करून घ्यावयास हवा होता. मात्र तसा कोणताही ठराव या सरकारने केला नाही. जर अदानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असे जर सरकार म्हणत असेल तर या सरकारने त्यांच्यावर कारवाई  का केली नाही? रात्री हात मिळवणी करायची आणि दिवसा आंदोलन करून टक्केवारीसाठी दबाव आणायचा असे हे सरकार आहे.

सर्व सामान्य माणसाला जगविण्याचे या सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. हे मृत्यूचे आकडे जाहीर करणारे सरकार आहे. कोरोना काळात या सरकारने जनतेला वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. केवळ मृत्यूचे आकडे जाहीर केले. कोकणातील परिस्थितीबाबत डेंजर झोनचा इशारा देण्यात आला होता, परंतु या सरकारने लोकांचे जीव वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आता हे सरकार मृत्यूची आकडेवारी देत आहे, असा टोलाही शेलार यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com