आम्हाला लोकशाही शिकवण्याआधी पक्षाच्या इतिहासात डोकवा : राहुल गांधींवर भाजप नेत्याची टिका - BJP Minister Lashes out at Congress Leader Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

आम्हाला लोकशाही शिकवण्याआधी पक्षाच्या इतिहासात डोकवा : राहुल गांधींवर भाजप नेत्याची टिका

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

देशातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांकडे फेसबुक दुर्लक्ष करीत आहे, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याला हरदिपसिंग यांनी उत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी दुसऱ्या पक्षाला लोकशाहीची तत्त्वे शिकवण्याआधी आपल्याच पक्षात डोकावून पहावे, असा सल्ला भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षात आवाज उठवणे म्हणजे हकालपट्टीला आमंत्रण देण्यासारखे आहे, अशीही टिका त्यांनी केली आहे. 

देशातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांकडे फेसबुक दुर्लक्ष करीत आहे, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याला हरदिपसिंग यांनी उत्तर दिले आहे. 

देशात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण आहे. त्यांच्या प्रभावाचा वापर करुन ते खोट्या बातम्या पसरवून समाजात दुही निर्माण करीत आहेत. अखेर अमेरिकी माध्यमांनी फेसबुकच्या खरेपणा जनतेसमोर आणला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर भाजप नेत्यांनी राहुल गांधींना उत्तरे द्यायला सुरुवात केली आहे. याचा पार्श्वभूमीवर हरदिपसिंग पुरी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. काँग्रेसमध्ये मतभेद व्यक्त करणाऱ्याला पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जातो, असा दावा हरदिपसिंग यांनी केला आहे. या पक्षाला गेल्या दोन लोकसभा निवडणुका मिळून शंभरहून अधिक जागा मिळवता आल्या नाहीत, अशीही टिका त्यांनी केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दुसऱ्याला सल्ले देण्याआधी राहुल गांधींनी आपल्याच पक्षाचा गेल्या सत्तर वर्षांचा इतिहास तपासला असता तर बरे झाले असते असाही टोला हरदिपसिंग पुरींनी लगावला आहे. काँग्रेसच्या सुमारे शंभर नेत्यांनी त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी करत पक्षांतर्गत निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेण्याची विनंती केली असल्याचे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले संजय झा यांनी नुकतेच केले होते. त्याकडेही हरदिपसिंग पुरी यांनी लक्ष्य वेधले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख