शिवसेनेच्या खासदार म्हणतात, "भाजप नेत्यांनी मोदींचा आदर्श घ्यावा.." - BJP leaders should follow Modi example | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या खासदार म्हणतात, "भाजप नेत्यांनी मोदींचा आदर्श घ्यावा.."

संपत मोरे
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे

पुणे : "महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा" असे आवाहन शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे. महाराष्ट्रात भाजपचे नेते मंदिर उघडा म्हणून आंदोलन करत आहेत. घंटी बजाव आंदोलन केले जात आहे. त्यावर खासदार गवळी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार गवळी म्हणाल्या, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले राम मंदिराचे भूमिपूजन चार लोकांना सोबत घेऊन केले. महाराष्ट्रात मात्र भाजपचे नेते मंदिर उघडा म्हणून आंदोलन करत आहेत. या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे."

"सध्या कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, अशा परिस्थितीत मंदिर उघडणे हे धोकादायक ठरू शकते. अशा काळात मंदिर उघडा म्हणजे म्हणजे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळा चार लोकांच्या उपस्थितीत केला. त्यांचा आदर्श भाजपच्या नेत्यांनी घ्यावा," असे आवाहन गवळी यांनी केले आहे.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय यंत्र खरेदीसाठी पुढाकार  

पुणे :"सातारा जिल्ह्यातील कोविड 19 च्या वाढत्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र कराड येथे नवीन कोविड 19 चे केंद्र सुरू करावे आणि आवश्यकता भासल्यास वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी माझ्या स्थानिक विकास निधीचा वापर करावा" अशी शिफारस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. "कोविड 19 विषाणूमूळे उद्घभवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यात सरकारच्या वतीने रॅपिड अँटी बॉडी टेस्टची संख्या वाढवल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवीन वाढणाऱ्या रुग्णांच्या उपचाराकरता सध्या बेड आणि व्हेंटिलेटरवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा विचार करता तसेच कोरोना रुग्णांचा विचार करता माझ्या प्रयत्नातून साकारलेल्या कराड शहरातील स्व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र कराड येथे नवीन कोरोना उपचार केंद्र तात्काळ सुरू करावे तसेच आवश्यकता भासल्यास वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्यकरता माझ्या स्थानिक विकास निधीचा वापर करावा," अशी शिफारस चव्हाण यांनी केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख