आमचं सरकार येऊ द्या...पेट्रोल 60 रुपयांत देऊ; भाजप नेत्याचा मोठा दावा

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजीच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यातून सामान्य नागरिकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.
bjp leader says if bjp comes to power in kerala we will give petrol 60 rupees per litre
bjp leader says if bjp comes to power in kerala we will give petrol 60 rupees per litre

कोची : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाही इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने मोठा दावा केला आहे. भाजपला निवडून दिल्यास पेट्रोल 60 रुपये लिटर देऊ, असे या नेत्याने म्हटले आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अद्याप केंद्रातील भाजप सरकारने इंधन दरवाढीतून जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतलेला नाही. 

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे राज्यात काही अस्तित्व नसले तरी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. इंधन दरवाढीवरुन राज्यात भाजपच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्याने पेट्रोलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. 

केरळमधील भाजपचे नेते कुम्मानम राजशेखरन म्हणाले की, केरळमध्ये भाजप सत्तेत आल्यास पेट्रोलचा समावेश आम्ही वस्तू व सेवा करात (जीएसटी) करू आणि जनतेला पेट्रोल 60 रुपये लिटरने देऊ. मात्र, राज्य सरकारने पेट्रोलियम उत्पादने जीएसटीत समाविष्ट करावीत, अशी मागणी केलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावानुसार पेट्रोलचे दर बदलतात. भाजपची याबाबत स्पष्ट भूमिका आहे. इंधनाचा समावेश जीएसटीत करायला हवा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत.

भाजप सत्तेत आल्यास आम्ही पेट्रोल जीएसटीमध्ये समाविष्ट करणार आहोत. त्यानंतर त्याचा दर प्रतिलिटर 60 रुपयांवर येईल. राज्य सरकारला इंधन दरवाढीबद्दल एवढी काळजी वाटत असेल तर त्यांनी पेट्रोलचा समावेश जीएसटीमध्ये आधीच करायला हवा होता, असे राजशेखरन यांनी म्हटले आहे. 

गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. पेट्रोलवर केंद्र व राज्याचा 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले आहेत. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com