नार्वेकर महाराष्ट्राचे जावई आहेत का? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

कोकणातील दापोली येथील बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे.
नार्वेकर महाराष्ट्राचे जावई आहेत का? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
bjp leader kirit somaiya targets shivsena leader milind narvekar

मुंबई : कोकणातील दापोली येथील बंगल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हल्लाबोल केला आहे. समुद्रकिनारी नियमांचे उल्लंघन करुन उभारलेला हा बंगला पाडल्याचा दावा नार्वेकरांनी केला होता. प्रत्यक्षात हा बंगला जागेवरच उभा आहे, असा दावा सोमय्यांनी केला. नार्वेकर हे काय महाराष्ट्राचे जावई आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. 

सोमय्या म्हणाले की, मंत्रालयातील संबधित अधिकाऱ्यांनी मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडण्याचे आदेश दिले. पण नार्वेकरांनी माहिती दिली की त्यांनी तो बंगला पाडला. प्रत्यक्ष पाहिले तर हा बंगला उभा आहे. नार्वेकर हे महाराष्ट्राचा जावई आहेत का? या बंगल्यावर कारवाई होत नाही. शिवसेना म्हणजे खंडणी सेना, ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार आहे. हा माफिया कंत्राटदारांचा अड्डा आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रधान कंपनीसोबतच्या आर्थिक व्यवहारांचा खुलासा केलेला नाही.  जाधवांची संयुक्त अरब अमिरातीमधील कंपन्यात पैसे गुंतवले. ते पैसे भारतातून पाठवण्यात आले आहेत.  प्रधान प्रा. लि. ही कंपनी शेल म्हणजेच बोगस कंपनी आहे. याबाबत प्राप्तिकर विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) अनेक खटले आहेत. यातील आरोपींनी मान्य केलं आहे की कशा प्रकारे बोगस कंपन्या तयार करुन जाधवांनी काळ्याचे पांढरे केले.  

हा काळा पैसा आला कुठून? हा पैसा पालिकेच्या कंत्राटदाराकडून आला का? याबाबत मी संबधीत विभागाकडे लेखीतक्रार दिली आहे. यशवंत जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवावा व त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांची प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली म्हणून आमदारकी रद्द व्हावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे सोमय्यांनी सांगितले. 

अनिल देशमुख प्रकरणावर सोमय्या म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भीती आहे. त्यामुळे ते आता गप्प आहेत. देशमुख हजर झाले तर  वाझे यांचे १०० कोटी कुठे-कुठे गुंतवले आहेत या गोष्टी समोर येतील. देशमुखांबाबत वाँरट काढून त्यांना फरारी घोषित करावे. 

Related Stories

No stories found.