जळगावातील फुटीर भाजप नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला गिरीश महाजनच करणार

जळगाव महापालिकेत भाजपला धक्का देत शिवसेनेने सत्तांतर घडवले आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
bjp leader girish mahajan will decide fate of bjp corporators in jalgaon
bjp leader girish mahajan will decide fate of bjp corporators in jalgaon

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने घोडेबाजार केल्याने भाजपचे नगरसेवक फुटले. त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील उद्या (ता.19) पक्षाची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती भाजपचे महापालिका गटनेते भगत बालाणी यांनी दिली.  

महापालिकेतील भाजपच्या पराभवाबाबत बोलताना बालाणी म्हणाले की, आमचे नगरसेवक आमच्यासोबत कायम होते. मात्र, भाजपने घोडेबाजार केल्याने ते फुटले. त्यांनी आता आहे त्या ठिकाणीच सुखी राहावे. पक्षातर्फे त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. याबाबत पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी उद्या (ता.19) पक्षाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. यावेळी आमदार जिल्हा अधक्ष राजू मामा भोळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपला व विशेषतः माजी मंत्री गिरीश महाजन यांना जबर धक्का बसला. शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने हा धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली आहे. शिवसेनेने निवडीआधीच विजयाचे फलक लावले होते. मतदानात शिवसेनेला ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसेंना केवळ तीस मते पडली. एमआयएमच्या तीन जणांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले.

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांचे तब्बल ५७ नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक आहेत. अशा स्थितीत सत्ताबदल अशक्य होता. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी बंड केले. आणि ते शिवसेनेला जाऊन मिळाले. या बंडाआधीच शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच, भाजपच्या बंड करणाऱ्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला.

महापौरपदासाठी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा अर्ज वैध ठरला.  त्यानंतर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. शहराच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले गेले. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचे सांगत भाजपच्या नगरसेविका अॅड.शुचिता हाडा यांनी त्यावर हरकत घेतली. पिठासन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या महापौरापदाच्या उमेदवार जयश्री महाजन व उपमहापौरपदाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांचे नाव गॅझेटप्रमाणे नसल्याने भाजपतर्फे उमेदवारीवर हरकत घेण्यात आली. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळली. ऑनलाइन प्रक्रियेत ८७ सदस्य दिसत असल्याने भाजपने हरकत घेतली. सरिता माळी या सदस्य नसतानाही दिसत असल्याने त्यावर हरकत घेण्यात आली. त्यावरून सदस्यांची जोरदार खडाजंगी झाली.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com