खडसेंच्या प्रवेशासाठी कोणतीही अट नाही; पुढील महिन्यातील मुहूर्त निघणार

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उघडपणे पक्षाच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती.
खडसेंच्या प्रवेशासाठी कोणतीही अट नाही; पुढील महिन्यातील मुहूर्त निघणार
bjp leader eknath khadse may join nationalist congress party in next month

जळगाव : भाजप ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी काही अटी टाकल्याची चर्चा होती. मात्र, अशा कोणत्याही अटी टाकण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. 

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी  खडसे यांच्या प्रवेशाला आक्षेप घेतला नाही. नेत्यांनी खडसे यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मक भूमिका बैठकीत घेतली होती. त्यामुळे खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार हे अखेर ठरले आहे. 

खडसे यांच्या प्रवेशासाठी त्यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवल्याची चर्चा सुरू होती. मात्र, याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडून कानोसा घेतला असता पक्षातर्फे खडसे यांच्यावर प्रवेशाबाबत कोणतीही अट ठेवण्यात आली  नसल्याचे सांगण्यात आले. चर्चेवेळी पक्षातील काही नेत्यांनी ही मागणी केली होती. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना फारसे गंभीरपणे घेतले नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीत खडसे नक्की केव्हा प्रवेश करणार याबाबत पक्षातील स्थानिक नेते अनभिज्ञ आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होऊन राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यातील राजकीय घडामोडी जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडवणाऱ्या ठरणार आहेत. खडसे यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. 

हेही वाचा : सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयने काय दिवे लावले? 

पंढरपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर केंद्र सरकारचा विश्‍वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, सीबीआय) नेमली. त्या एजन्सीने आत्तापर्यंत काय दिवे लावलेत? असा प्रश्‍न करून या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या भाजपला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टोला लगावला. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी रान उठविले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in