मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही : एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. यावर आता खुद्द खडसे यांनीच खुलासा केला आहे.
bjp leader eknath khadse clarifies about party membership resignation
bjp leader eknath khadse clarifies about party membership resignation

जळगाव : मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दिली. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. खडसे यांनी मात्र, राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त 'सरकारनामा'ने दिले  होते. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना खडसे म्हणाले की, मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. मी जे करतो ते कधीही लपवत नाही आणि रोखठोक करतो. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असता तर मी ते स्वतः जाहीरपणे सांगितले असते. असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझ्या प्रवेशाचे मुहूर्त मी कधीच जाहीर केले नाहीत. हे सर्व मुहूर्त माध्यमांनी काढले आहेत.असे जर काही असेल तर मी स्वतः जाहीरपणे बोलेन, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी (ता.22) निश्चित झाला असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी (ता.22) खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.

खडसे यांनी काल (ता.17) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची  भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्याचवेळी त्यांच्या प्रवेशाचे निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत होते. खडसे यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून माहिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही याला दुजोरा दिला होता.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांची भेट टाळणारे एकनाथ खडसे यांनी काल (ता. 17 ऑक्‍टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांची मात्र आवर्जून भेट घेतली होती. रावेरमध्ये घडलेल्या हत्याकांडातील कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात या खडसे यांनी देशमुखांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com