कोरोना लशीसाठी पैसेच नाहीत; मोदी सरकारनं मागितलं 2 अब्ज डॉलरचं कर्ज

कोरोना लसीकरणासाठी 2 अब्ज डॉलरचे कर्ज मागण्याची वेळ मोदी सरकारवर आली आहे.
Covid Vaccination
Covid Vaccination File Photo

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. सरकारने कोरोना लशीचे 100 कोटी डोस देण्याचा मैलाचा टप्पा नुकताच गाठला होता. आता या लसीकरणासाठी 2 अब्ज डॉलरचे कर्ज मागण्याची वेळ मोदी सरकारवर आली आहे. बीजिंगस्थित एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक (AIIB) आणि मनिलास्थित एशियन डेव्हलपमेंट बँक(ADB) या दोन बँकांकडे कर्जाची मागणी करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एआयआयबी आणि एडीबी यांच्याकडे भारताने लसीकरणासाठी 2 अब्ज डॉलरचे कर्ज मागितले आहे. भारताच्या या विनंतीवर विचार सुरू असून, हे कर्ज लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. एडीबीकडून 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज मिळणार असून, एआयआयबीकडून 50 कोटी डॉलरचे कर्ज मिळणार आहे. या कर्जाच्या रकमेतून केंद्र सरकार कोरोना लशीची खरेदी करणार आहे. भारत सरकारही यासाठी 5.8 कोटी डॉलर खर्च करणार आहे.

या कर्जाच्या रकमेतून कोरोना लशीचे 66.7 कोटी डोस खरेदी केले जाणार आहेत. यातून 19 राज्यांतील 31.7 कोटी नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. या लसीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी एडीबीच्या एशिया-पॅसिफिक व्हॅक्सिन्स अॅक्सेस फॅसिलिटी (एपीव्हॅक्स) अंतर्गत होणार आहे. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. अर्थ मंत्रालयाकडे याबाबत विचारणा केली असता मंत्रालयाने यावर प्रतिसाद दिलेला नाही.

Covid Vaccination
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारला अच्छे दिनचा अँगल!

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.

Covid Vaccination
महागाईच्या झळा : दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलचे चटके आणखी वाढणार

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com