वरुण यांच्यासोबत मेनका गांधींनाही भाजपचा मोठा धक्का
Maneka Gandhi and Varun Gandhi

वरुण यांच्यासोबत मेनका गांधींनाही भाजपचा मोठा धक्का

पक्षाच्या विरोधात जाहीर भूमिका घेणे भाजपचे खासदार वरुण गांधी यांना महागात पडले आहे.

नवी दिल्ली : पक्षाच्या विरोधात जाहीर भूमिका घेणे भाजपचे (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांना महागात पडले आहे. याचा फटका त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी (Maneka Gandhi) यांनाही बसला आहे. वरूण गांधींच्या ट्विटनंतर काही तासांतच त्यांना आणि त्यांच्या मातोश्रीं राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं आहे.

भाजपने गुरूवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमधून वरूण गांधींना वगळण्यात आलं आहे. तसेच खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलेला आहे. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. याचवेळी शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांनाही वगळलं आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेचे व्हिडीओ ट्विटवर शेअर करत भाजपचे खासदार वरूण गांधींनी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. वरूण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर सातत्याने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

Maneka Gandhi and Varun Gandhi
आतापर्यंत किती जणांना अटक केली? सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारला धरले धारेवर

लखीमपूर खिरीमध्ये जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणालाही हादरवून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या वाहनांचे मालक, त्यांमध्ये बसलेले लोक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे. या ट्विटनंतर काही तासांतच भाजपनं कार्यकारिणीची घोषणा केली. त्यामध्ये वरूण गांधी आणि मेनका गांधी यांना वगळण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maneka Gandhi and Varun Gandhi
देशात सर्वांत स्वस्त अन् महाग पेट्रोल कुठं मिळतं? जाणून घ्या...

दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in