महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 च्या बाता; अन् विधान परिषदेच्या तीन मतदार संघात तीन तऱ्हा

Legislative Council Election : भाजपला निवडणुकीत उमेदवार मिळाले नाही!
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Legislative Council Election : जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी बिरुदावली मिरावणाऱ्या भारतीय जनता पक्षाची राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरती दमछाक झाली आहे. राज्यात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे मिशन भाजपने सुरु केले आहे. मात्र, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात उमेदवार मिळाले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) तीन मतदार संघात तीन तऱ्हा अशी अवस्था झाली आहे.

नागपूर शिक्षक मतदार संघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांचा बालेकिल्ला आहे. तरीही मागील दोन निवडणुकीत आणि आता याही निवडणुकीत भाजपला नागो गाणार यांना पाठिंबा द्यावा लागला आहे. भाजपला स्वत: चा उमेदवार येथे मागील 12 वर्षातही तयार करता आला नाही.

Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde News : शिंदे गटाला पहिला धक्का! जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा; कारण...

दुसरीकडे कोकण शिक्षक मतदार संघात भाजपने शिवसेनेचे (Shivsena) नेते ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. कोकण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, भाजपला येथेही उमेदवार आयात करावा लागला, त्यामुळे त्यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. येथे भाजपचा सामना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्याशी आहे. मागली निवडणुकीत त्यांना पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती. तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६ हजार ८८७ मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी भाजपने म्हात्रे यांना गळाला लावले आहे.

Chandrashekhar Bawankule
Nana Patole म्हणाले, सत्यजीत तांबेंच्या तोडीस तोड उमेदवार देऊ, सोमवारी कळेलच...

नाशिक मतदार संघात तर दररोज समिकरणे बदलत आहेत. काँग्रेसचे (Congress) उमेदवार सुधीर तांबे यांनी पक्षाने तिकिट देऊनही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांनी सत्यजीत तांबे यांचा अपक्ष अर्ज भरला. तांबे यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी भाजप नेत्यांनी सूचक वक्तव्य केली आहेत. येथे भाजपचा अधिकृत उमेदवार नाही. ते तांबे यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मतदार संघातही भाजपला सक्षम उमेदवार मिळाली नाही. त्यामुळे तांबे यांच्यावर डोळा ठेवाना लागत आहे. त्यामुळे या तीन मतदार संघात भाजपची चांगलीच फजिती झाली आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com