गड आला पण सिंह गेला! विधान परिषदेत भाजपला मोठा धक्का

निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, विशेष म्हणजे यात भाजपच्याच आमदाराचा उघडपणे हात आहे.
BJP

BJP

Sarkarnama

बंगळूर : कर्नाटकात स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) भाजप (BJP) हा 12 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस (Congress) 11 जागांसह दुसऱ्या स्थानी तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला (JDS) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, मुख्य प्रतोदांचाच पराभव झाला आहे. विशेष म्हणजे यात भाजपच्याच आमदाराचा उघडपणे हात आहे.

कर्नाटकात स्थानिक स्वराजसंस्था मतदारसंघाच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या. या निवडणुका 25 जागांसाठी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान 14 आमदार, भाजपचे 7 तर जेडीएसचे 4 आमदार यांचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपत आसल्याने या निवडणुका झाल्या. यात भाजपला 12, काँग्रेसला 11, जेडीएसला 1 आणि इतरांना 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर विधान परिषदेत बहुमत मिळेल, असा भाजपला कयास होता. परंतु, केवळ एका जागेमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
काँग्रेसच्या अब्जाधीश भंगारवाल्याला भाजपनं विधान परिषदेत चारली धूळ

भाजपचे मुख्य प्रतोद महंतेश कवटगीमठ यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. ते विद्यमान आमदार होते आणि बेळगावमधून रिंगणात उतरले होते. त्यांच्यासोर काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचे आव्हान होते. येथून हट्टीहोळी आणि जारकीहोळी हे विजयी झाले. दुसऱ्या पसंतीच्या मतात जारकीहोळींनी कवटगीमठ यांच्यावर बाजी मारली. विशेष म्हणजे भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे ते बंधू आहेत. त्यांनी उघडपणे आपल्या भावाला पाठिंबा दिला होता. भाजपच्या आमदारामुळेच मुख्य प्रतोदांचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
काँग्रेसला मागे टाकूनही एका जागेमुळं भाजपचं बहुमताचं स्वप्न मिळालं धुळीस..

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्यासाठी या निवडणुका नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या होत्या. त्यांना यात यश आले असले तरी विधान परिषदेतील बहुमत मिळवता आले नाही. विधान परिषदेत बहुमत नसल्याने भाजपला जेडीएसची मदत घ्यावी लागत आहे. आताही भाजपला जेडीएसवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com