बलात्कार प्रकरणात अडकलेल्या नेत्याला भाजपने दाखवला बाहेरचा रस्ता

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली आहे.
bjp cancels manish nayak primary membership over arrest
bjp cancels manish nayak primary membership over arrest

भोपाळ : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी हा भाजप (BJP) नेता असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नेत्याला भाजपने अखेर बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

भाजपचे दिडोंरी जिल्हाप्रभारी मनीष नायक यांना अटक झाली आहे. त्यांच्यासोबत दिनेश अवधिया आणि अमित सोनी यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील अवधिया हा संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) दिंडोरी जिल्हा प्रमुख असल्याचे समजते. याचबरोबर अमित सोनी हा पेट्रोलपंपाचा मालक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी मात्र, याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

नायक यांच्या अटकेने मोठी खळबळ उडाली असून, भाजपनेही याची गंभीर दखल घेतली आहे. पक्षाने तातडीने नायक यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. नायक यांच्या अटकेने राज्यातील भाजप सरकार बॅकफूटवर गेले आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारची कोंडी करण्यास सुरवात केली होती. अखेर पक्षाने नायक यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले आहे. 

भोपाळचे पोलीस अक्षीधक साई कृष्ण थोटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियानातील एका मुलीला एक महिला फसवून भोपाळला घेऊन आली होती. नंतर त्या मुलीला भोपाळमधील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तिथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात भाजप नेत्यासह तिघांची ओळख पटली. त्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. 

या प्रकरणी पीडित मुलीने 19 ऑगस्टला अशोका गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, या मुलीला एक महिला बसमध्ये भेटली. नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्या महिलेने मुलीला भोपाळला नेले. नंतर संबंधित महिलेने त्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर 13 आणि 19 ऑगस्टला फ्लॅट आणि हॉटेलमध्ये काही जणांनी बलात्कार केला. या मुलीने 19 ऑगस्टला तेथून पलायन करुन पोलीस ठाणे गाठले. 

पोलिसांनी मुलीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन कारवाई केली. पीडित मुलगी ही हरियानातील पालवल येथील आहे. ती मागील महिन्यातून घरातून पळाली होती. या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पारूला राठोड आणि सीमा या दोन महिलांसह त्यांचा सहकारी सैफ खान याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकून 6 जणांना अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com