भाजपचं सोशल इंजिनिअरींग! 60 टक्के उमेदवार ओबीसी, दलित अन् 21 आमदारांचा पत्ता कट

भाजपने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : भाजपने (BJP) आज उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 60 टक्के उमेदवार इतर मागास वर्ग (OBC) आणि दलित आहेत. याचवेळी भाजपने 20 टक्के आमदारांना डच्चू दिला आहे. मागील काही दिवसांत ओबीसी आणि दलित नेत्यांनी भाजपला रामराम केल्याने पक्ष नेतृत्वाने आता या वर्गावर लक्ष दिले आहे.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपमधून नुकतेच 3 ओबीसी मंत्री आणि डझनभर आमदार बाहेर पडले आहेत. स्वामीप्रसाद मौर्य, दारासिंह चौहान आणि धरमसिंह सैनी या तीन मंत्र्यांनी उघडपणे भाजपवर निशाणा साधला होता. भाजप सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी काहीही केले नसल्याचा हल्लाबोल या नेत्यांनी केला होता. यामुळे भाजपने यादी जाहीर करताना त्यात या वर्गाला जास्तीत जास्त स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाचे सरचिटणीस अरुणसिंह यांनी ही पहिली यादी जाहीर केली.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
आता तिथेच राहा, परत येऊ नका! अखिलेश यादवांचा योगींना टोला

भाजपने आज जाहीर केलेल्या 107 उमेदवारांच्या यादीत पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवार आहेत. यात ओबीसी उमेदवार 44 असून, दलित उमेदवार 19 आहेत. विद्यमान 63 आमदारांना तिकिट देण्यात आले आहे. याचवेळी 21 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीत 10 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ओबीसी आणि दलित आरक्षण नसलेल्या खुल्या जागेवरही भाजपने या वर्गातील उमेदवार दिले आहेत. विद्यमान 21 आमदारांचे तिकिट कापण्यात आले आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
मुख्यमंत्र्यांना दे धक्का! पक्षानं भावाचंच तिकिट कापलं

गोरखपूरमधून योगी तर सिराथूमधून मौर्य

आता योगी हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे सिराथू मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in