बिर्याणी खाऊन पुणे विद्यापीठाच्या शाकाहार सक्तीला विरोध 

बिर्याणी खाऊन पुणे विद्यापीठाच्या शाकाहार सक्तीला विरोध 

पुणे : शाकाहाराच्या सक्तीला विरोध करण्यासाठी पुण्यातील भीम आर्मी संघटनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज बिर्याणी खाऊन आंदोलन केले. या अभिनव आंदोलनाला जोरदार प्रतिसाद देखील मिळाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर ठाण मांडून बसलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बिर्यानी खाऊन विद्यापीठाच्या शाकाहार सक्तीला विरोध केला. 

योगमहर्षी रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती सरस्वती शेलार यांच्या नावाने 2006 पासून विद्यापर्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येते. विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला सरस्वती शेलार यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.तर विज्ञानेतर शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येते. सुवर्णपदक मिळण्यास पात्र असणारा विद्यार्थी शाकाहारी असावा, अशी दोन्ही पुरस्कारासाठी अट घालण्यात आली आहे. 

योगमहर्षी शेलारमामा आयुष्यभर शाकाहारी होते. त्यांच्या इच्छेनुसार शाकाहारी असलेल्या विद्यार्थ्यास पुरस्कार देण्याची अट घालण्यात आली. 2006 पासून सुरू झालेल्या या पुरस्काराला सुरवातीपासूनच ही अट होती. मात्र यार्षी हा मुद्दा उपस्थित झाला आहे. माध्यमात या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. अशी सक्ती करता येते का या संदर्भाने ही चर्चा सुरू असून शाकाहाराची अट काढून टाकण्यात यावी, अशी एक मागणी आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून शाकाहाराची अट काढण्यास विरोध झाला तर काय करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

अशा परिस्थितीत ही दोन्ही सुवर्णपदके रद्द करण्याशिवाय विद्यापीठाच्या कुलगुरूंपुढे पर्याय राहणार नसल्याचे विद्यापीठातील तज्ञ सांगतात. दरम्यान कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असून पुरस्कारासाठी काय खावे, याची सक्ती करणे योग्य नाही, तसे करता येत नाही, अशी भूमिका भीम गर्जना या संघटनेने घेतली आहे. 
 

Related Stories

No stories found.